lightning sakal
छत्रपती संभाजीनगर

Lightning : कोसळणाऱ्या विजेचा धोका मराठवाड्यात कायम

अवकाळी पावसात व पावसाळ्यात वीज पडून माणसे व पशू दगावतात. शिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. नियमित पावसाळ्याच्या तुलनेत अवकाळी पावसात पडणारी वीज अत्यंत धोकादायक ठरते.

मधुकर कांबळे

छत्रपती संभाजीनगर - पावसाळ्यात व अवकाळी पावसाच्या काळात वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते, ही हानी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज प्रतिबंधक यंत्रणा बसवली पाहिजे. मात्र, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केवळ ४०७ ठिकाणी ही यंत्रणा आहे. त्यातील १५ वीज यंत्रे बंद आहेत. जालना व परभणी जिल्ह्यात तर एकही वीज प्रतिबंधक यंत्र सुरू नसल्याने वीज पडून होणारी जीवित व वित्तहानी कशी टाळणार, असा प्रश्न आहे.

अवकाळी पावसात व पावसाळ्यात वीज पडून माणसे व पशू दगावतात. शिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. नियमित पावसाळ्याच्या तुलनेत अवकाळी पावसात पडणारी वीज अत्यंत धोकादायक ठरते. अचानक कोसळणाऱ्या विजेला रोखता तर येत नाही. मात्र, तिला जमिनीत प्रवाहित करून होणारी हानी टाळता येते. यासाठी वीज प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात येते.

यासाठी नुकतीच विभागीय आपत्ती व्यवस्थापन समितीकडून विभागातील प्रत्येक जिल्ह्यात वीज प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित आहे का; तसेच, ती चांगल्या स्थितीत आहे का? याची खातरजमा करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.

एक वीज प्रतिबंधक यंत्र ३० मीटर म्हणजेच शंभर फूट परिघातील वीज जमिनीकडे प्रवाहित करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा यंत्रांची गरज आहे. सद्यःस्थितीत मराठवाड्यात ४०७ ठिकाणी वीज प्रतिबंधक यंत्रे असून त्यापैकी ३९२ ठिकाणची यंत्रे काम करीत आहेत. उर्वरित १५ ठिकाणची यंत्रे सध्या बंद पडलेली आहेत. शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या गरजेनुसार वीज प्रतिबंधक यंत्रे खरेदी करणे बंधनकारक आहे.

बीड जिल्हा आघाडीवर

बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३०८ ठिकाणी वीज प्रतिबंधक यंत्रणा आहे. त्यापैकी ३०० ठिकाणी यंत्रणा सुरू आहे, तर आठ ठिकाणी बंद आहे. छत्रपती संभाजीनगरात ७९ ठिकाणी असून, सर्व ठिकाणी ती सुरू आहे. सर्वाधिक वाईट परिस्थिती जालना व परभणी जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यांत क्रमशः तीन व चार ठिकाणी ही यंत्रणा आहे. मात्र, एकाही ठिकाणी सुरू नाही.

महाळंगी येथे विज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यु

चाकूर,(जि. लातूर) - वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना महाळंगी (ता.चाकूर) येथे रविवारी घडली. झाडे उन्मळल्यामुले घर, काही वाहनांचे नुकसान झाले आहे. महाळंगी परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी शिवाजी नारायण गोमचाळे (वय ३५) व ओंकार लक्ष्मण शिंदे (३०) हे शेतात होते. अंगावर वीज पडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यु झाला. आमदार बाबासाहेब पाटील यांनी विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संख्या वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नुकतीच टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींसमोर वीज पडून होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी वीज प्रतिबंधक यंत्रांची संख्या वाढवून प्रत्येक जिल्ह्यात १०० यंत्रे बसविण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे सांगितले.

मात्र, प्रत्यक्षात सध्याची स्थिती खूपच वेगळी आहे. बीड वगळता सर्वच जिल्ह्यांतील यंत्रांचा आकडा शंभरच्या खालीच आहे. हिंगोली जिल्ह्यात २, नांदेड ४, लातूर ३ आणि धाराशिव जिल्ह्यात ४, तर हिंगोली जिल्ह्यात फक्त २ ठिकाणी वीज प्रतिबंधक यंत्रणा चालू स्थितीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आता पावसाला सुरवात होण्यापूर्वी या यंत्रांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT