औरंगाबाद : कोरोना या विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. यावर अद्यापही लस उपलब्ध नसून, औषध शोधण्याचे जगभरातले शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, सरकारचे पुढील निर्देश येईपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. आपल्या संसर्गामुळे लोकांचा बळी जाऊ नये, याची काळजी घ्यावी, स्वतःला यापासून वाचवावे. राज्यातील जनतेने केंद्र आणि राज्य सरकारला समाज आणि राष्ट्रहितासाठी सहकार्य करावे, असे आवाहन साहित्यिकांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
हेही वाचा : कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..
पत्रकात म्हटले, की कोरोनाने युरोपातल्या प्रगत देशांत थैमान घातले आहे. तिथे अत्यंत प्रगत साधने असूनसुद्धा तिथेही मृतदेह उचलायला माणसे नाहीत. आपल्या भारतात चीनइतकी किंबहुना त्यापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. शिवाय आपल्याकडे अंधश्रद्धा आणि अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे. हा आजार संसर्गजन्य आहे.
हेही वाचा : हातावर शिक्का असलेला पाहुणा आला अन उडाला गोंधळ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे अविश्रांतपणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. पत्रकावर ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, श्रीधर नांदेडकर, सुदाम मगर, बाबा भांड, डॉ. दादा गोरे, डॉ. सुधीर रसाळ, श्रीकांत उमरीकर, डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची नावे आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.