Eco-friendly sanitary pads  sakal
छत्रपती संभाजीनगर

Women's health : ‘सॅनिटरी पॅड’निर्मिती अन् दातृत्वाची भावना,फक्त सेवाभावी संस्थांनाच प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गरजवंतांना मदत करायची पण सामाजिक भान जपायचे या भावनेतून शहरातील महेंदरसिंग सेवा फाउंडेशन शहरात सेवाभावी प्रकल्प राबवत आहे. फाउंडेशनमार्फत इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड तयार केली जातात. हे पॅड ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर फक्त आणि फक्त सेवाभावी संस्थांना दिली जातात. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे संपूर्ण उत्पन्नही सेवाभावी संस्थेलाच दिले जाते.

फाउंडेशनच्या सचिव गुरलीन कौर कोहली ग्रुमर असून एका सोशल क्लबच्या माजी अध्यक्ष होत्या. क्लबच्या माध्यमातून सामाजिक कामात भाग घेताना गुरलीन यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. महिन्याच्या ‘त्या’ चार दिवसांतील शारीरिक समस्या महिला निमूटपणे सहन करतात. महत्त्वाचे म्हणजे, सॅनिटरी पॅड घेणे प्रत्येकीला परवडण्याजोगे नव्हते.

गुरलीन यांनी यावर तोडगा काढत स्वतःच सॅनिटरी पॅड तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पॅड पर्यावरणपूरक असावेत यासाठी त्यांनी दोन वर्षे अभ्यास केला. मुंबई, पुणे, पॅडमॅन म्हणून प्रसिद्ध झालेल्या तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांच्या युनिटला भेट दिली.

२०१७ मध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी माफक दरात तयार होणारे इको फ्रेंडली सॅनिटरी पॅडचे युनिट सुरू केले. गुरलीन कोहली फाउंडेशनच्या सचिव असून त्यांच्या सासूबाई तेजिंदर कौर कोहली अध्यक्ष आहेत. हे पॅड तयार करताना केमिकल्सचा वापर होत नाही आणि त्यांचे विघटनही होते.

मिळालेले उत्पन्नअपंग मुलांसाठी

कमी किमतीत परवडण्याजोगे सॅनिटरी पॅड वैयक्तिक उपयोगासाठी न देता त्या स्वयंसेवी संस्थांना देतात. इनरव्हील क्लब, लायन्स क्लब आणि मुंबईची बाई फ्रेडी दराब पेडर चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था महेंदरसिंग सेवा फाउंडेशनकडून पॅड घेतात आणि स्वयंसेवी संस्थांना देतात. महिन्याकाठी जवळपास दोन हजार नॅपकिन्सची ऑर्डर त्यांच्याकडे हमखास असते. यातून मिळालेल्या उत्पन्नातून नारेगाव इथल्या चैतन्य कानिफनाथ अपंग मुलांची शाळेस दिले जाते.

फाउंडेशनमार्फत असे युनिट सुरू करावे ही संकल्पना माझ्या सासू तेजिंदर कौर कोहली यांची होती. या प्रकल्पाला आम्ही व्यावसायिक दृष्टीने बघत नाही. केवळ पर्यायपूरक सॅनिटरी पॅड तयार करून ते गरजू महिलांना द्यावे म्हणून आमचे काम सुरू आहे. सध्या हेडगेवार रुग्णालयात आणि  मुंबईला पॅड जातात.

- गुरलीन कोहली, सचिव, महेंदरसिंग सेवा फाउंडेशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Candidates: मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्यात राज ठाकरेंचे दोन उमेदवार देणार कडवी झुंज! नावे जाहीर

Ganesh Naik : संदीप नाईक तुतारी फुंकणार; उमेदवारी जाहीर होऊनही गणेश नाईकांची नाराजी

Latest Maharashtra News Updates : संदीप नाईक उद्या तुतारी हाती घेणार; वडील गणेश नाईकांना भाजपकडून दिली आहे उमेदवारी

Ranji Trophy 2024: Cheteshwar Pujara चे १८वी डबल सेंच्युरी! हर्बट शटक्लिफ अन् मार्क रामप्रकाश यांचा विक्रम मोडला

CJI Chandrachud: सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सपाच्या खासदाराकडून शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT