मंगेश मालोदे सकाळ
छत्रपती संभाजीनगर

आईसमोर शिवीगाळ केल्याने राग अनावर, मित्राचा चाकूने भोसकून खून

अनिल जमधडे

औरंगाबाद : आईसमोर शिवीगाळ केल्याचा राग आल्याने संतापलेल्या गुन्हेगाराने मित्राला भरचौकात चाकूने भोसकले. ही थरारक घटना (Crime In Aurangabad) गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास संजयनगरात (Aurangabad) घडली. जिन्सी पोलिसांनी तात्काळ कुख्यात गुन्हेगार शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या शेख अहेमद (वय २४, रा. गौसिया मशिदजवळ, कैलासनगर) याला अटक केली. त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी दिले आहेत. मंगेश दिनकर मालोदे (२८, रा. संजयनगर, गल्ली क्र. ७) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगेश मालोदे हा गरवारे कंपनीत कामाला होता. याच परिसरातील कुख्यात गुन्हेगार भुऱ्याशी त्याची चांगली मैत्री होती. २१ जुलै रोजी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर भुऱ्याने गुरुवारी मंगेश व त्याच्या वडिलांची माफी मागितली होती.(man brutally killed his friend because of using abuse words before mother aurangabad crime news glp88)

गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मंगेश संजयनगरातील गल्ली क्रमांस सी-७ च्या चौकातील ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी भुऱ्या त्याच्या आईसोबत जात असताना दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी आईसमोर शिवीगाळ केल्याचा राग अनावर झाल्याने भुऱ्याने चाकूने मंगेशच्या डाव्या हातावर आणि डाव्या पायाच्या पोटरीवर सपासप दोन वार केले. मंगेश रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर व त्यांच्या पथकाने भुऱ्याच्या मुसक्या आवळल्या. फॉरेन्सिक लॅबचे (Forensic Lab) पथक घटनास्थळी बोलावण्यात आले होते. या घटनेनंतर शुक्रवारी (ता. २३) सकाळी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे (Deputy Police Commissioner Deepak Girhe) यांनी घटनास्थळाची पाहणी करत पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सुचना केल्या.

तो रस्त्यावरच विव्हळत पडला

भुऱ्याने मंगेशवर चाकुने वार केला. त्यानंतर क्षणातच रक्ताची धार लागली. मंगेश पडलेला ओटा रक्ताने माखून गेला होता. मंगेश जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होता. मात्र, वेळेवर कुणीही धावून आले नाही. शेवटी तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने मंगेशचा मृत्यू झाला. वेळेत मदत मिळाली असती तर त्याचा जिव वाचला असता, अशी या भागात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

गुन्हेगार भुऱ्या

भुऱ्या कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हाणामारी आणि लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. संजयनगर, कैलासनगर, भवानीनगर भागात त्याची प्रचंड दहशत आहे. गांजा आणि दारू पिण्याच्या सवयीचा तो आहे. गेल्या वर्षी एका व्यक्तीच्या खिशातील बारा हजार रुपये हिसकावून भुऱ्याने पळ काढला होता. त्याला पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार हारुण शेख, संजय गावंडे आणि संतोष बमनात यांनी २६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. याशिवाय हाणामारीचे चार ते पाच गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आजपर्यंत अनेकांनी भितीपोटी तक्रारी दिलेल्या नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीने केला घात

मंगेश मालोदे हा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. घरात आजारी आई, वडील, थोरला भाऊ आणि विवाहित बहीण असे हे कुटूंब आहे. मंगेशच्या भुऱ्यासोबतच्या मैत्रीला घरातूनच विरोध होता. भुऱ्यासोबत राहू नको असे कुटुंबियांकडून सांगितले जात होते. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात मंगेशचा थोरला भाऊ उमेश याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक राजेश मयेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT