Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad | आजाराला कंंटाळून संपवले जीवन, पैठणमधील धक्कादायक घटना

पैठणमधील धक्कादायक घटना

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद ) : गाढेगाव पैठण शिवारातील एका विहिरीच्या पाण्यात सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी पुरूषाच्या पार्थिवाची ओळख पटवण्यास बिडकीन पोलिसांना यश आले आहे. मुलानीवाडगाव येथील मनोरूग्ण व कर्णबधीर असलेल्या एकनाथ नाना ताकवाले याने आजाराला कंटाळुन जीवन संपवल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील लोहगाव- शेकटा रस्त्यावरील गाढेगाव शिवारातील हरिशचंद्र मल्होत्रा (रा.औरंगाबाद) यांच्या गटमधील (नंबर १७) विहीरीत गुरूवारी (ता.तीन) अनोळखी पंचेचाळीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. (Man End His Life Due To Illness In Paithan Taluka Of Aurangabad)

अग्निशमन दल जवानांनी पाण्यात सडलेला अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्यावर ओळख पटत नसल्याने पोलीसांनी बिडकीन स्मशानभूमीत जागेवर शवविच्छेदन व अंत्यसंस्कार केल्यावर पोलीसासमोर तपासाचे मोठे आव्हान होते. परतु सकाळ, सोशल मीडियावरील बातमीमुळे पोलीस नातेवाईकांपर्यंत पोहोचले. त्यांना मृताचे कपडे टी शर्ट, गळ्यातील माळ, उजव्या हातावर बजरंग बलीचा फोटो, ओम, गोंदलेल्या चिन्ह दाखवताच अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत सावखेडा (ता.गंगापूर) येथील बहिणीकडे राहत होता.

आठ दिवसांपूर्वी तो चितेगाव येथे पत्नी मुलांना भेटण्यासाठी जातो असे सांगून गेलेल्या मनोविकारग्रस्त एकनाथने विहिरीत आत्महत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगाव बीट जमादार सोमनाथ तांगडे यांनी दोन दिवसांत तपास केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT