Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Accident|औरंगाबाद-पुणे महामार्गावर अपघात, एक गंभीर जखमी

महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन किलोमीटर अंतरापर्यन्त वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या.

जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-पुणे महामार्गावर नवीन कायगाव (ता.गंगापूर) येथे कंटेनर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये गुरुवारी (ता.नऊ) सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान ऊस ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने त्यामधील उसाचे टिपरे रोडवर पांगले आहे. तसेच रोडच्या बाजूने गॅस पाईप लाईनचे खोदकाम सुरू असल्याने मातीचे ढीग पडले आहे. त्यामुळे हायवे रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमंडल्याने दोन्ही बाजूने तीन किलोमीटर अंतरापर्यन्त वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेने नगरकडे साखर कारखान्यास ऊस घेऊन जाणारा ट्रक यास कंटेनर यांचा गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नवीन कायगाव (ता.गंगापूर) जवळ (Gangapur) जोराचा भीषण अपघात झाला. यात ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. त्यातील ऊसाचे टिपरे रोडवर पसरली आणि ट्रक रोडवर आडवा झाला. (Aurangabad-Pune Highway)

रस्त्याच्या बाजूला गॅस पाईप लाईनचे खोदकाम सुरू असल्याने मातीचा ढीग पडल्याने वाहने निघण्यास अडथळा झाला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमंडल्याने दोन तीन किलोमीटर अंतरापर्यन्त वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ता अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या अपघातात केवळ कंटेनर चालकालाच जबर मार लागला आहे. त्यास तात्काळ दाखवण्यात पोहोचवले. रास्ता अपघातामुळे कोलमंडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

पर्यायी मार्गाचा वापर

पर्यायी मार्ग म्हणून पुणे, नगरहुन औरंगाबादला जाणारी वाहने जुने कायगावमार्गे गंगापूर आणि तेथून भेंडाळा फाट्यावर वाहने काढून औरंगाबाद पुणे हायवे रोडला मार्गस्थ करण्यात आली. आणि औरंगाबादहुन नगर, पुणे जाणारी वाहतूक भेंडाळा फाट्यावरून गंगापूर मार्गे जुने कायगावहुन औरंगाबाद-पुणे हायवे रोडला वळविण्यात आली. आणि जी वाहने रस्ता अपघातात अडकली होती त्यांची निघण्याची मोठी अडचण झाली. वाहतूक ठप्पमुळे अनेकांची महत्त्वाची कामे हुकली, तर शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची गैरसोय झाली. दरम्यान अपघातग्रस्त दोन्ही वाहनांची मोठी नुकसान झाली. पण सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र ऊस वाहतूक ट्रक मधील उसाच्या टिपरांची मोठी नुकसान झाली आहे. रोडवर पसरलेले उसाचे टिपरे जेसीबीच्या साहाय्याने गोळा करून रस्ता बाजूला करण्यात आले आणि अपघातग्रस्त वाहने पोकलेंडने उचलून रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. तब्बल तीन-चार तास नंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.आणि रस्त्याच्या जामिंगमध्ये अडकलेल्या वाहनधारक, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT