sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : फडणवीस, अजित पवारांना ‘तो’ संपवू शकतो

मनोज जरांगे यांची छगन भुजबळ यांच्यावर टीका; नादी न लागण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘तुम्ही मोठ्या लोकांना अंगावर घेतले असेलही; पण, माझ्या नादी लागू नका. मराठा आरक्षणावरही बोलू नका. धनगर आरक्षणाविषयी काहीच बोलत नाही. हा माणूस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही संपवू शकतो. याच्यापासून सावध राहा,’’ अशी टीका मनोज जरांगे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली.

जरांगे शनिवारी येथे आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जरांगे किस झाड की पत्ती है,’ असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. त्यावर जरांगे म्हणाले, ‘‘हा माणूस खूप घातकी आहे. गरीब ओबीसी, धनगर समाजाचा वापर त्यांनी स्वतःवरील गुन्हे मागे घेण्यासाठी केला. उद्या तो फडणवीस आणि अजित पवार यांनाही संपवू शकतो. त्यांनी माझ्या नादी लागू नये. मराठ्यांच्या आरक्षणाविषयी बोलूच नये. ते धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी काहीच बोलत नाहीत. मराठा समाजाविरोधात धनगर समाजाला उभे करीत आहे. याला बळी पडू नका.’’

सरसकट गुन्हे मागे घ्या

‘‘सरकारने आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेणार असल्याचे सांगितले होते; पण, निष्पाप मराठा समाजावर अन्याय केला. सरसकट गुन्हे मागे घ्या हे सरकारमधील मंत्र्यांनीच (फडणवीस) सांगितले होते. त्यामुळे हे गुन्हे त्यांना मागे घ्यावेच लागतील. कोणत्याही जाळपोळीचे आम्ही समर्थन करीत नाही. हे तेव्हाही सांगितले होते, आताही तेच सांगत आहोत. मराठा समाजातील मुलांना जाणीवपूर्वक उचलून तुरुंगात टाकले जात आहे. हे समाज पाहत आहे. समाजात सरकारविषयी नाराजी आहे,’’ असेही जरांगे म्हणाले.

मी संताजी-धनाजी यांच्यासारखा

‘‘अनेकजण तुमच्यावर टीका करीत आहेत,’’ या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘‘मी विरोधकांना धनाजी-संताजीसारखा पाण्यात दिसू लागल्यामुळे ते माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांनी कितीही विरोध केला, तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT