Manoj Jarange Patil sakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil :शांतता रॅलीत महिलांनी केले चालकाचे व बैलांचे औक्षण

नवनाथ इधाटे पाटील

Cha Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मागील गेल्या दोन दिवसापासून फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील ऋत्विक डिडोरे हा आपली बैलगाडी घेऊन शहरात मराठा आरक्षणासंदर्भात असणाऱ्या शांतता रॅलीची जनजागृती करीत आहे.

शनिवारी सकाळी हडको परिसरामध्ये सदरील बैलगाडी जनजागृती करण्यासाठी आल्याने परिसरातील महिलांनी बैलगाडीचे औक्षण करून एक मराठा, लाख मराठा..! अशा घोषणा दिल्या.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानक ते क्रांती चौक अशी महा शांतता रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. या महा शांतता रॅलीसाठी जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील ऋत्विक डिडोरे हा बैलगाडी घेऊन दोन दिवसापासून छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये जनजागृती करीत आहे.

सदरील जनजागृती शनिवारी सकाळी करीत असताना हरसुल टी पॉईंट, हडको परिसर, टीव्ही सेंटर परिसर, एम-२ परिसर आदी भागातील महिलांनी सदरील बैलगाडी महामार्गावरच थांबून बैलगाडी चालक ऋतिक डीडोरे व बैलांचे औक्षण केले. यावेळी महिलांनी एक मराठा, लाख मराठा..! आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे..! , मनोज जरांगे पाटील आप आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..! अशा विविध घोषणा महिलांनी देऊन परिसर दणाणून सोडला होता. 

....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT