बोरसर बुद्रुक (ता.कन्नड, जि.औरंगाबाद) : मुस्लिम समाज बांधव व पंढरीनाथ गायकवाड यांच्यात पोलिसांनी वाद मिटविल्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आदी.  सकाळ
छत्रपती संभाजीनगर

कब्रस्तान अन् शेतजमिनीचा वाद मिटला, पोलिसांनी घेतला पुढाकार

संतोष गंगवाल

मात्र, देवगाव रंगारी पोलिसांनी पुढाकार घेत सदर वाद मिटविण्यात यश मिळविले आहे. एवढा जुना वाद मिटविल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहे.

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : बोरसर बुद्रूक (ता.कन्नड) (Kannad) येथील मुस्लिम कब्रस्तान कंपाउंड व त्या लगत असलेल्या शेतजमिनीचा जवळपास १५ वर्षांपासून वाद सुरु होता. मात्र, देवगाव रंगारी पोलिसांनी (Devgaon Rangari Police) पुढाकार घेत सदर वाद मिटविण्यात यश मिळविले आहे. एवढा जुना वाद मिटविल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बोरसर येथे मुस्लिम कब्रस्तान असलेल्या जागेच्या शेजारी पंढरीनाथ गायकवाड यांची (Aurangabad) जमीन आहे. या जागेवरुन गेल्या १५वर्षांपासून शेतकरी आणि मुस्लिम समाज बांधव यांच्यात वाद सुरु होता. दरम्यान, १४ मे रोजी रमजान ईद नमाज पठणानंतर मुस्लिम बांधव आपल्या पूर्वजांच्या दर्शनासाठी कब्रस्तानात गेले असता मुस्लिम बांधवांना तेथील कंपाउंडचे पोल खाली पडलेले दिसले. (Many Years Dispute Among Muslim And Hindu Comunity Settle Down)

याबाबत कमिटी अध्यक्ष शेख अशपाक यांनी ही माहिती देवगाव रंगारी पोलिस ठाण्यास कळविली. माहिती मिळताच प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी गावाला भेट देत याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली व या घटनेमुळे हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा वाद कायमचा मिटविण्याचा निश्चय पोलिसांनी केला. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलिस पाटील व दोन्ही समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी जागेबाबत सर्वमान्य तोडगा काढून सदरील शेतकरी पंढरीनाथ गायकवाड व मुस्लीम बांधव यांच्यात समझोता घडवून वाद संपुष्टात आणला. एवढा जुना वाद जागेवरच मिटविल्याबद्दल ग्रामस्थ व मुस्लिम बांधवांनी सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT