Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

आमच्या भगिनीला शिंदे सरकारकडून न्याय मिळेल का ! मराठा समाजाची मागणी

कोपर्डीच्या घटनेला सहा वर्षे पूर्ण, समाजतर्फे श्रद्धांजली !

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोपर्डी आमच्या भगिनीवरील अत्याचाराच्या घटनेला बुधवारी (ता.१३) सहा वर्षें पूर्ण झाली. यातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यांना अजूनही फासावर लटवकले नाही. गेल्या सहा वर्षांत दोन सरकार बदलले, तिसरे सरकार सत्तेवर आले आहे. सत्तेवर आलेल्या शिंदे, भाजप (BJP) सरकारने या आरोपींना फाशीच्या देत आमच्या त्या ताईला न्याय द्यावा, अशा भावना मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांतर्फे त्या भगिनीला श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त करण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चा आणि समाज बांधवातर्फे बुधवारी औरंगाबादच्या (Aurangabad) हडको येथील मराठा मंदिरात कोपर्डी घटनेतील भगिनीला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. (Maratha Community Want Justice From Shinde Government In Case Of Khopardi)

या कार्यक्रमात सुरेश वाकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, अभिजित देशमुख, रमेश गायकवाड, मनिषा मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी वाकडे म्हणाले, दोन सरकार येऊन गेले, तरी आमच्या भगिनीला न्याय मिळाला नाही. नव्या सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. ते आरोपींना फासावर लटकवत न्याय मिळवून देतील. वेताळ म्हणाले, आमच्या भगिनीला न्याय मिळावा यासाठी सर्व समाज एकवटला होती. एवढच नाहीतर ५८ मोर्चे काढण्यात आले. तरीही सरकारने आरोपींनी फाशी दिले नाही. अजून किती दिवस वाट पाहायची असा सवाला त्यांनी केला. गायके म्हणाले, ही घटना आठवली की अंगावर काटा येतो. यामुळे आता सरकारने अंत न पाहाता तात्काळ आरोपींना फासावर लटकावेत. रेखा वाहटूळे म्हणाल्या, या घटनेनंतर ज्या पद्धतीने समाज एकवटला होता, तेव्हा वाटले होते, या नराधमांना फाशी होईल. मात्र एवढ होऊनही फाशी झालेली नाही. यामुळे अशा घटनाही सर्वत्र वाढल्या आहेत.

मनिषा मराठे म्हणाल्या, महिलांना सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलले जात नाही. त्यामुळेच कोपर्डीसारख्या घटना घडतात. यामुळे महिलांना स्वरक्षणासाठी शस्त्र बळगण्याची मुभा देण्यात यावी. आरोपींनी तात्काळ फाशी देण्यात यावी असेही मराठे म्हणाल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश देशमुख, संदीप जाधव, अशोक मोरे, सचिन मिसाळ, गौरव सपकाळ, योगेश औताडे, विलास औताडे, अभिजीत काकडे, गिरीष झाल्टे, रवींद्र वाहटुळे, रेखाताई वाहाटूळे, मनीषा मराठे, सुकन्या भोसले, अजय गंडे, मुरलीधर जगताप, माधवभाऊ जेऊघाले, अमोल भोसले, संतोष काळे, रामेश्वर काळे, अक्षय लोंढे, अशोक देशमुख, एकनाथ गावंडे, साहेबराव लोमटे, प्रदीप हारदे, सचिन शिंदे, रवींद्र तांगडे, आत्माराम शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT