Devendra Fadnavis  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : गृहमंत्री फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची फ्रंट पेज जाहिरात

राजेंद्र साबळे पाटील यांनी मराठवाडा आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे.

दत्ता लवांडे

जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागच्या दोन आठवड्यापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण थांबवण्याची मागणी करत पोलिसांनी आंदोलकांवर आणि उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला केल्यामुळे मराठा आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर रोष व्यक्त केला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची फ्रंट पेज जाहिरात देण्यात आली आहे.

अंतरवाली सराटी येथील आंदोलन चिघळल्यावर मराठा आंदोलकांनी टरबूज फोडून, फडणवीसांच्या फोटोची अंत्ययात्रा काढून, फोटो जाळून त्यांचा निषेध केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील राजेंद्र साबळे पाटील यांच्या नावाने जाहिरात देण्यात आली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा या जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.

जाहिरातीमध्ये फडणवीसांनी केलेल्या या कामाचा केला उल्लेख

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परताा योजना, राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना, महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, सारथी विभागीय कार्यालये, श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडोजर्मन टूल रूम प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्ती योजना, महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना, छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाच्या ५० हजार प्रती प्रकाशित या कामाचा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.

Advertisement

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

जाळपोळ, दगडफेक, लाठीहल्ला, निषेध, गदारोळ झाल्यानंतर सरकारने दोन वेळा मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेतले पण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना सरकारने घेतलेले निर्णय मान्य नसल्यामुळे ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीवर ते ठाम आहेत. जोपर्यंत हा निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा पिणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रभर मराठा आंदोलकांनी त्यांना पाठिंबा देत साखळी उपोषण सुरू केले असून अनेक ठिकाणी गावे बंद ठेवून आंदोलने केले जात आहेत. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली असून त्यामध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT