Manoj Jarange Sakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange : उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये रवाना! वैद्यकीय तपासणी, उपचार होणार

अंबड येथून छत्रपती संभाजी नगर येथे वैद्यकीय तपासणी साठी रवाना झाले आहे.

दिलीप दखने

वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे ता. 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी उपोषण करत होते. अखेर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले.

रविवार ता.17 रोजी वैद्यकीय उपचार, तपासणी करीता अंतरवाली सराटी येथून त्यांना रूग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येणार आहे. तेथे जरांगे यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची उपोषण दरम्यान उपोषण स्थळी वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. शनिवार ता.16 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत फोनवर चर्चा केली. वैद्यकीय तपासणी साठी छत्रपती संभाजी नगर येथील हॉस्पीटल मध्ये दाखल व्हावे करीता विनंती केली.

त्यानंतर "मी उपोषण स्थळी उपचार घेतो" असे जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. मुख्यमंत्री यांच्या विनंती प्रमाणे रविवारी ता.17 रोजी जरांगे पाटील सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराटी ता. अंबड येथून छत्रपती संभाजी नगर येथे वैद्यकीय तपासणी साठी रवाना झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pranav Pandey: क्रिकेटरच्या पप्पांचा JDU मध्ये प्रवेश; वडिलांचे नाव प्रणव पांडे, पण इशान आडनाव 'किशन' असं का लिहितो?

Jaishankar on Terror Attack : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिलं नाही, पण...; एस जयशंकर मोठं वक्तव्य

IND vs NZ: न्यूझीलंडचा दुसऱ्या ODI सामन्यात पलटवार; भारतासमोर मालिका विजयासाठी मोठ आव्हान

PM Modi On Digital Arrest : तुम्हालाही 'डिजिटल अरेस्ट'चा धोका... PM मोदींनी सांगितले बचावाचे उपाय

IND vs NZ: SuperWomen! राधा यादवचे दोन अफलातून कॅच पाहून तुम्हीची हेच म्हणाल; पोरीनं गाजवलंय मैदान, Video

SCROLL FOR NEXT