suicide sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ३२ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षण आणि बँकेच्या थकीत कर्जामुळे नैराश्यातून ३२ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. दत्ता कालिदास महिपाल (रा. शिंदेवाडी जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

बारावी उत्तीर्ण दत्ता हा पाच महिन्यांपूर्वी माजलगावहून कामाच्या शोधात वाळूज येथे आला. तो कृष्णा पवार याच्या समवेत वडगाव (को.) परिसरात भाडेतत्वावर एका खोलीत राहत होता. हे दोघेही खासगी कंपनीमध्ये काम करत होते. मंगळवारी पवार रात्रपाळीला गेला होता तर दत्ता हा घरीच होता.

रात्री दत्ताने भाऊ महेश महिपाल याला दत्ताने ‘घेतलेले कर्ज न फेडल्याने बँकेतून फोन येतात आणि दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नाही, त्यामुळे आत्महत्या करत आहे’, असा व्हॉट्सअपवर संदेश केला. महेशने सकाळी साडेसहाला हा संदेश वाचला. त्याने वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेले अशोक सुरवसे यांना दत्ताच्या खोलीवर पाठविले. मात्र, तोवर दत्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पाच दिवस बेमुदत उपोषण

दत्ता महिपाल याने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात सलग पाच दिवस उपोषण केले होते. पण आरक्षणचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आलेल्या नैराश्यातून दत्ताने टोकाचे पाऊल उचलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT