रायगडमध्ये कोरोनाबाधित आणखी सहा जण 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात रुग्णसंख्येत घट, पाच हजारांवर नवीन कोरोनाबाधित

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी ७७४ एकूण कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील २८४ व ग्रामीण भागातील ४९० रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मराठवाड्याला (Marathwada) शनिवारी (ता.आठ) काहीअंशी दिलासा मिळाला. मागील पाच दिवसांच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांच्या (Corona) नव्या रुग्णांसह मृत्यूमध्येही घट झाली. दिवसभरात एकूण ५ हजार ५२६ नवे रुग्ण आढळले तर ११६ जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी ७७४ एकूण कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील २८४ व ग्रामीण भागातील ४९० रुग्णांचा समावेश आहे. २४ जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ८४९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे तर नव्याने ५८४ कोरोना रुग्ण आढळून आले असून ६४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सहा हजार ६४५ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात १,३३९ नवे रुग्ण, १८ मृत्यू, उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात ६२९ नवे रुग्ण, ११ मृत्यू तर लातूर (Latur) जिल्ह्यात ११०२ नवीन रुग्ण आणि २७ मृत्यूची नोंद झाली. (Marathwada Corona Updates Corona Patients Number Slightly Decline In Marathwada)

नांदेड जिल्ह्यात शनिवारी ४९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात एक हजार ४३ बाधित रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ६२४ इतकी झाली असून, त्यापैकी ७६ हजार ९४४ रुग्ण कोरोनामुक्त तर एक हजार ६९६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार ६९१ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात ४३६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात एक हजार ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातील कक्षात सात हजार १५७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात पाच रुग्णाचा मृत्यू झाला तर नवीन १६५ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सध्या ९१० रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी ४३२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अशी झाली घट

ता. ७ मे

रुग्ण : ५, ८५९

मृत्यू : १३९

------

६ मे

रुग्ण : ६, ७३७

मृत्यू : १६८

----

५ मे

रुग्ण : ६,६५८

मृत्यू : १४१

---------

४ मे

रुग्ण : ६,१८८

मृत्यू : १६०

--------

३ मे

रुग्ण : ६,६४९

मृत्यू : १३५

-------

२ मे

रुग्ण : ६११५

मृत्यू : १२१

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT