dharashiv sakal
छत्रपती संभाजीनगर

Dharashiv News : जिल्ह्यामध्ये माता मृत्युदर ५० टक्क्यांपर्यंत घटला

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून ५० हजार महिलांच्या खात्यावर १९ कोटी रुपये वर्ग

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीने जिल्ह्यातील माता मृत्यूदर ५० टक्क्यापर्यंत घटला आहे. शिवाय दवाखान्यात प्रसुती होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५० हजार ११० महिलांच्या खात्यावर १९ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

बालमृत्यूमध्ये घट व्हावी, सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, यासाठी शासनाकडून ही योजना राबविली जात आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून गरोदर आणि स्तनदा मातांसाठी राबविली जाते. १ जानेवारी २०१७ पासून या योजनेला सुरूवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील माता मृत्यूदर घटला आहे. शिवाय दवाखान्यात प्रसुती होण्याचे प्रमाणही ८७ टक्क्यावरून ९९ टक्क्यापर्यंत पोहचले आहे.

५० हजार महिला लाभार्थी

१ जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ५० हजार ११० महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये २०१७-१८ वर्षात १३ हजार ८२४ लाभार्थ्यांना चार कोटी ५० लाख ५२ हजार रुपये, २०१९-२० वर्षात ११ हजार १८३ महिलांना पाच कोटी ३६ लाख ६९ हजार रुपये, २०२०-२१ वर्षात आठ हजार १८६ महिलांना तीन कोटी २८ लाख ५७ हजार रुपये, २०२१-२२ या वर्षात आठ हजार सहाशे ऐशी महिलांना तीन कोटी २६ लाख ४१ हजार रुपये, २०२२-२०२३ (फेब्रुवारी २०२३) वर्षात आठ हजार २३७ महिलांना तीन कोटी ३० लाख १७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून १९ कोटी ७२ लाख ३७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

असा झाला योजनेत बदल

नोंदणी झालेल्या प्रत्येक महिलेला यापूर्वी पाच हजार रुपयांचा लाभ दिला जात होता. आता मात्र संबंधित महिलेला ८ लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा देण्यात आली आहे. याशिवाय दुसऱ्या प्रसुतीदरम्यान मुलगी झालेल्या महिलेला दोन टप्प्यात सहा हजार रुपये दिले जात होते. आता मात्र एकाच टप्प्यात सहा हजार रुपये दिले जात आहेत.

योजना सुरू होण्यापूर्वी मातामृत्यूदर ४३.४९ होता. म्हणजेच एक लाख महिलांच्या प्रसुतीमागे ४३.४९ महिलांचा मृत्यू होत असे. आता तेच प्रमाण २०.७४ टक्क्यापर्यंत आले आहे. यामध्येही कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

- डॉ. कुलदीप मिटकरी, वैद्यकीय अधीक्षक, धाराशिव.

जिल्ह्यात या योजनेची चांगली अंमलबजावणी झालेली आहे. त्यामुळे महिलांना याचा फायदा होत आहे. यापुढेही योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. गरोदर आणि स्तनदा असलेल्या जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा.

- डाॅ. एस. एल. हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT