संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

मनोरुग्णांना आता घाटीतच मिळणार पूर्ण उपचार

याेगेश पायघन

औरंगाबाद- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मनोविकृतिशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) 10 जानेवारीला मान्यता दिली आहे. एमडी सायकिऍट्री हा मराठवाड्यातील पहिला अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानही घाटीने मिळवला आहे. या अभ्यासक्रमासाठी तीन सीट्‌सला एमसीआयने मान्यता दिल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी दिली. 

जालन्याचे मनोरुग्णालय रखडले
मराठवाड्यात विभागीय पातळीवर शासकीय मनोरुग्णालय नाही. प्रादेशिक मनोरुग्णालयाला जालना येथे उभारणीला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात रुग्णसेवा मिळण्याला किती वर्षे लागतील हे स्पष्ट नाही. त्यामुळे गोरगरीब मनोरुग्णांना खासगी रुग्णालय किंवा येरवडा येथे जाऊन उपचार घ्यावे लागत होते. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारल्यावर मनोविकृती विभागाचा आंतररुग्ण विभाग कार्यान्वित केला. जिल्ह्यात गोरगरीब रुग्णांना हा एकमेव आसरा आहे. त्यानंतर त्यांनी मनोविकृतिशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी डॉ. संजीव सावजी यांची प्राध्यापक म्हणून कंत्राटी नियुक्ती केली. 

मनोचिकित्सक घडतील
घाटीने 2020 मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते. 29 नोव्हेंबर 2019 ला एमसीआयकडून पाहणी झाली त्यात भौतिक आवश्‍यक निकष पूर्ण केल्याने एमसीआयने एमडी सायकिऍट्रीच्या तीन जागा मंजूर केल्या. वर्ष 2020 या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया होण्याची शक्‍यता घाटी प्रशासनाने व्यक्त केली. मनोविकृतीच्या पीजीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थी तयार होतील. मनोचिकित्सक घडतील, शिवाय रुग्णांनाही फायदा होईल, विश्वास डॉ. येळीकर यांनी व्यक्त केला. 

अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी एमडी सायकिऍट्री सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यांनी पाठपुरावा केला आणि आम्ही प्रयत्न केले. यात रुग्णालय प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे हे शक्‍य झाले.
डॉ. प्रदीप देशमुख, मनोविकृती विभागप्रमुख, घाटी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : अमित शाह यांच्याऐवजी स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सभा

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT