आडुळ : गेल्या अनेक वर्षांपासुन मोसंबीचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणारया आडुळ (ता. पैठण) सह परिसरातील शेतकरयांनी डाळींबाला चांगला भाव मिळत असल्याने व बाग फळाला ही अवघ्या दोनच वर्षात येत असल्याने येथील अनेक मोसंबी उत्पादक शेतकरी यांनी चार पाच वर्षांपासुन मोसंबीबागा तोडुन डाळींब बागेला पसंती दिल्याने परिसारात डाळींब बागेच्या क्षेञात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे माञ मोसंबी बाग धारक शेतकरीच मोसंबी झाडे तोडुन डाळींब बाग लावित असल्याने परिसरातील मोसंबीच्या क्षेञात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
येथील मोसंबी देशात प्रसिध्द असल्याने परिसरातील मोसंबीला मोठ्या प्रमाणात मागणी होती माञ गेल्या काही वर्षांपासुन मोसंबीचे दर सतत कधी गगनाला तर पाताळाला भिडत असल्याने त्याच्या दरात नेहमी अनियमितता होती शिवाय लागवडीपासुन पाच वर्षांपर्यंत मोसंबी बागेची फळधारणा न करता त्याला विना उत्पन्नाचे जोपासावे लागते त्या तुलनेत डाळींबा बागेला दुसरयाच वर्षी फळ धारता येत असल्याने अवघ्या एका वर्षांनतरच शेतकरयांचे उत्पन्न निघणे सुरु होते त्यामुळे आपोआप शेतकरयांचा डाळींब बागेकडे वाढल्याचे चिञ परिसरात दिसुन येते.
मोसंबी रोपवाटिकेला ही उतरती कळा
आडुळ परिसरातील मोसंबी देशात प्रसिध्द असल्याने येथील मोसंबीच्या रोपट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. येथील रोपांना राज्यातच नव्हे तर परराज्यातुन हि दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे येथील अनेक मोसंबी बागधारक शेतकरयांसह इतर शेतकरयांनी शासकिय व खाजगी रोपवाटिका उभआरुन त्यातुन मोसंबी रोपांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु केली होती.
कमी क्षेञात जास्तीचे उत्पन्न मिळत असल्याने येथील अनेक शेतकरी रोपवाटिकेच्या माध्यमातुन कोट्याधिश झाले माञ गेल्या चार पाच वर्षांपासुन मोसंबीच्या क्षेञात झपाट्याने घट होत असल्याने येथील अनेक रोपवाटिकेतील मोसंबी रोपे विक्री झाली नसल्याने रोपवाटिका धारक शेतकरयाला त्यावर रोटा हाणावा लागला. त्यामुळे येथील रोपवाटिकाधारक शेतकरयांना गेल्या तिन चार वर्षांपासुन मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागल्याने येथील रोपवाटिकाधारक शेतकरी अर्थिक संकटात सापळले आहे.
यंदा डास व भापेने फळगळती
ज्यांच्याकडे मोसंबी बागा आहे त्यांच्या मोसंबी बागेला ही यंदा परिसरात जास्तीचा पाऊस झाल्याने भापे व नंतर डासांचा प्रार्दुभाव होवुन मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. त्यात मोसंबीचे दर ही कमालीचे घटल्याने मोसंबी उत्पादक शेतकरयांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे डाळींबाला यंदा चांगला भाव मिळल्याने येथील डाळींब उत्पादक शेतकरयांना डाळींब बागेतुन मोठी कमाई झाल्याने अनेक मोसंबी उत्पादक शेतकरयांनी मोसंबी बागा तोडुन त्या जागी डाळींब बागा लावल्या आहेत.
माझ्याकडे गेल्या २१ वर्षांपासुन मोसंबीची ३०० झाडांची बाग होती यातुन वार्षिक उत्पन्न फक्त दोन ते तीन लाख मिळत होते. त्यामुळे मी दोन वर्षापुर्वी मोसंबीबाग तोडुन त्याजागी ८५० झांडाची डाळिंब बाग लावली व पहिल्याच वर्षी मला यातुन १० लाखाचे उत्पन्न मिळाले...... पंढरीनाथ चव्हाण (शेतकरी, गेवराई आगलावे)
यंदा डाळिंब ९० हजार ते १ लाख ४० हजार रुपये प्रति टन प्रमाणे विक्री झाले तर त्या तुलनेत मोसंबी १५ हजार ते ३५ हजार रुपये प्रति टन प्रमाणे विक्री होत आहे. त्यात मोसंबीचे अगोदर भापेमुळे तर आता डासांमुळे फळगळती होत आहे.... भगवान नवले (मोसंबी व्यापारी, आडुळ)
यंदा मोसंबी रोपांची चांगली विक्री होईल असे वाटले होते माञ शेतकरी आता डाळींबाची लागवड करीत असल्याने आमच्या कडिल मोसंबी रोपे जशीच्या तशी पडुन आहेत तर काही रोपे विक्री होत नसल्याने बांधावर तोडुन फेकुन दिली....( गणेश कोल्हे, खाजगी रोपवाटिका धारक शेतकरी आडुळ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.