madan subhash gojare sakal
छत्रपती संभाजीनगर

MPSC Result 2024 : आत्मविश्वासाच्‍या जोरावर शेतकऱ्याचा मुलगा फौजदार; ‘एमपीएससी’त मिळविली चौथी रँक

मदन सुभाष गोजरे याच्या या यशाने सर्वत्र होणारे कौतुक पाहून त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ आनंदाने हरखून गेले. गावातील सर्वप्रथम अधिकारी होण्याचा मान त्याने मिळविला.

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : वडजी (ता. पैठण) येथील शेतकऱ्याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून चौथी रँक घेऊन पोलिस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळविला. मदन सुभाष गोजरे याच्या या यशाने सर्वत्र होणारे कौतुक पाहून त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ आनंदाने हरखून गेले. गावातील सर्वप्रथम अधिकारी होण्याचा मान त्याने मिळविला.

वडजी येथील शेतकरी सुभाष ऊर्फ बाबूतात्या गोजरे यांची परिस्थिती जेमतेम, स्वतःसह पत्नी शेतात काबाडकष्ट करून आपली तीन मुले व एका मुलीच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. थोरला मुलगा आप्पासाहेबने पदवीपर्यंत शिक्षण घेतले, पुढील शिक्षण परिस्थितीमुळे सोडावे लागले.

त्यानंतर आई-वडील व आप्पासाहेब यांनी काहीही झाले, तरी दुसऱ्या क्रमांकाचा मदन व धाकटा प्रद्युम्न, मुलगी रोहिणी यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सरकारी सेवेत नोकरी मिळेपर्यंत न थांबण्याचा निश्चय केला, ते शेतात राबून हाती आलेली आपली कमाई मुलांच्या ‘करिअर’वर खर्च करत होते.

कुटुंबीय घामातून मिळविलेला पैसा आपल्या शिक्षणावर खर्च करीत असल्याचे पाहून हे तिघे जण अहोरात्र अभ्यास करू लागले. परिस्थितीने कितीही मागे खेचले, तरी त्यावर मात करत खचून न जाता जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर मदन, प्रद्युम्न व रोहिणी यांनी आई-वडिलांच्या कष्टाला प्रतिसाद दिला.

रोहिणी व प्रदुघ्न हे दोघे वैद्यकीय क्षेत्रात अंतिम वर्षात शिकत आहेत, त्यांचा डॉक्टर होण्याचा मानस आहे.मदनने चौथीपर्यंतचे शिक्षण वडजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर पाचवी ते अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले.

पोलिस खात्याविषयी स्वतःसह कुटुंबीयांना आकर्षण असल्याने मदनने ऑक्टोबर २०२२ मध्ये लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पूर्वपरीक्षा दिली. यात उत्तीर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती.

१६ जुलै २०२४ रोजी मुलाखत पार पडली. मात्र, त्याने एवढ्यावर न थांबता ऑगस्ट २०२३ मध्ये तलाठीपदासाठीही परीक्षा दिली होती. त्याचा निकाल मार्च २०२४ मध्ये लागून मदन यातही उत्तीर्ण झाला. पोलिस उपनिरीक्षकाच्या नोकरीचे काय होईल सांगता येत नाही, म्हणून मिळेल ती नोकरी करण्याची तयारी त्याने दर्शविली.

पहिलाच अधिकारी झाल्याने गावासाठी प्रेरणादायी आदर्श

जेव्हा गावात मदन पीएसआय झाल्याचे समजले, तेव्हा गावकऱ्यांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू तराळले. आई-वडिलाने केलेल्या कष्टाचे मुलाने चीज केल्याचे त्यांनी सांगितले. गावात त्याचा जंगी नागरी सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मदन हा त्याच्या गावातून पहिलाच अधिकारी झाल्याने सर्वांसाठी तो प्रेरणादायी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT