sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चला खेळूया’ अभियान सुरू

शाळकरी, महाविद्यालयीन मुले मैदानांपासून दूर गेली असून, सतत मोबाइलमध्ये मग्न असतात. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘चला खेळूया’ अभियान सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शाळकरी, महाविद्यालयीन मुले मैदानांपासून दूर गेली असून, सतत मोबाइलमध्ये मग्न असतात. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘चला खेळूया’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी अतिक्रमणे झालेल्या, अथवा कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मैदानांचे आणि खुल्या जागांचे आता रूपडेच पालटविले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तीन-चार महिन्यांत शहरातील खुल्या जागा, आरक्षित भूखंड, गृहनिर्माण संस्थेतील जागांचा शोध घेऊन यादी तयार केली आहे. त्यात ३२५ मैदानांचा समावेश आहे. साताऱ्यात मात्र दोनच जागा उपलब्ध आहेत.

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘चला खेळूया’ अभियानासाठी शहरातील खुल्या जागांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार क्रीडा विभाग व वॉर्ड कार्यालयामार्फत मैदानांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार यादी तयार करण्यात आली आहे. त्यात जॉगिंग ट्रॅक, खुली जागा, मंदिरासमोरील जागा, व्यायामशाळा, उद्यानाच्या बाजूची जागा, गाळ्यांच्या बाजूची जागा, व्यापारी संकुलाजवळील जागा, लहान मैदाने, मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्थांमधील जागांचा समावेश आहे. प्रभाग सातअंतर्गत सर्वाधिक १५७ मोकळ्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. सातारा-देवळाई वॉर्डात सातारा परिसरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, रबिया मशीद, अमेरनगर या दोन जागा उपलब्ध झाल्या आहेत. देवळाई परिसरात एकही मैदान अथवा खुली जागा मिळालेली नाही.

या नऊ मैदानांचा होणार विकास

अनेक मैदाने लोकसहभागातून विकसित केली जाणार आहेत. तसेच नऊ मैदाने महापालिका निधीतून विकसित केली जाणार आहेत. त्यात सप्तशृंगीनगर पडेगाव, मिटमिटा येथील देवगिरी व्हॅली, खाराकुंवॉं अंगुरीबाग गुजराती शाळेजवळ, ताठे मंगल कार्यालयाच्या बाजूला मयूरनगर एन-११ हडको, गोल्डन सिटी ईटखेडा कांचनवाडी, उमा गोपालनगर गट नंबर ४४ येथील खुली जागा, गट नंबर १२ व्यंकटेशनगर सातारा परिसर, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, कोकिळाबेननगर बीड बायपास या मैदानांचा समावेश आहे.

नशेबाजांसह भूखंडमाफियांचा त्रास

काही मैदाने, खुल्या जागांचा वापर कचरा, घाण टाकण्यासाठी होत आहे. अनेक ठिकाणी दिवसभर टवाळखोर मुले मैदानांवर नशा करत बसतात. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. - खुल्या जागा, मैदाने महापालिकेच्या ताब्यात असली तरी भूखंडमाफियांनी त्याची बनावट कागदपत्रे तयार करून या जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकसहभाग गरजेचा

मुलांना खेळण्यासाठी त्याच भागातील नागरिकांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून मैदानाचा विकास करावा, असे आवाहन प्रशासकांनी केले. त्याला काही भागात प्रतिसाद मिळत आहे तर काही भागात नागरिक उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

हे आहे आव्हान

अनेक मैदानांवर अतिक्रमणे झालेली आहेत. काही ठिकाणी इमारती बांधून जागा गिळंकृत करण्यात आल्या आहेत. प्रशासनासमोर अतिक्रमणे हटविण्याचे आव्हान आहे.

मैदानांच्या विकासासाठी

प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरात ‘आम्हाला खेळू द्या’ अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने प्रत्येक भागात जाऊन खुल्या जागा, मैदानांची माहिती घेऊन याद्या तयार केल्या आहेत. त्यानुसार त्याच परिसरातील नागरिकांनी ही मैदाने दत्तक घेऊन त्याचा वापर परिसरातील मुलांच्या खेळण्यासाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

— रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

कोट्यवधींचा निधी हवा

मोकळ्या जागा, आरक्षित भूखंडाच्या जागांची साफसफाई करून त्याठिकाणी खेळांची मैदाने विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यासाठी महापालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. तथापि, हा निधी उभारताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. दरम्यान, काही खुल्या जागेत, मैदानांवर ओपन जीम बसविण्यात आल्या आहेत; पण त्याची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या दुरूस्तीकडेही तातडीने लक्ष द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT