toll naka sakal
छत्रपती संभाजीनगर

Toll Naka : नारायणगडावर जाणाऱ्या बांधवांना टोलमध्ये सवलत; सकल मराठा समाजाची विनंती ‘एनएचएआय’ने केली मान्य

दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोचली असून छत्रपती संभाजीनगरहून नारायणगडावर जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी धुळे-सोलापूर रस्‍त्यावरील पाचोड येथील टोलनाक्यावर सवलत देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्ह्यातील नारायणगडावर (ता. शिरूर कासार) आज (ता. १२) भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोचली असून छत्रपती संभाजीनगरहून नारायणगडावर जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी धुळे-सोलापूर रस्‍त्यावरील पाचोड येथील टोलनाक्यावर सवलत देण्यात आली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोड टोल नाक्यावरील संबंधितांची भेट घेत गडावर जाणाऱ्या मराठ्यांची वाहने मोफत सोडण्याची विनंती केली होती.

सकल मराठा समाजाचे सुरेश वाकडे यांनी सांगितले, की शहरासह जिल्हाभरातून तीन हजारांवर वाहने नारायणगडावर जाणार आहेत. याशिवाय स्थानिक तसेच पाचोड जवळपासच्या गावातून जाणाऱ्या वाहनांचीही मोठी संख्या आहे. समाजाचे सुनील कोटकर यांनी पाचोड येथील टोलनाका व्यवस्‍थापनाची भेट घेत तीन हजारांहून अधिक वाहनांना मोफत सोडण्याची विनंती केली, त्यासाठी मात्र वाहनांना भगवा झेंडा आणि नारायणगड दसरा मेळाव्याचे स्टिकर लावावे लागणार आहे.

मी स्वतः टोल नाका व्यवस्थापनास भेटलो आहे. त्यांनीही ही विनंती मान्य केली असून मराठ्यांनी टोल नाक्यावरील फास्ट टॅग सेन्सरच्या अलीकडेच नारायणगडावर जात असल्याचे सांगावे लागेल. त्यानंतरच वाहने सोडली जातील. टोलनाक्यावर वाद घालत बसू नये, असे मी आवाहन करतो.

- सुनील कोटकर, सकल मराठा समाज

सकल मराठा समाजातर्फे नारायणगडावर जाण्यासाठीच्या वाहनांना मोफत टोलची विनंती करण्यात आली होती. यासंदर्भात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून काही पत्रव्यवहार झाला नाही, असे असले तरी समाजाच्या विनंतीवरून नारायण गडावर जाणाऱ्या वाहनांना टोलवरून मोफत वाहने सोडली जाणार आहेत.

- महेंद्र पाटील, शिफ्ट इंचार्ज, पाचोड टोल नाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT