Criminal gang Arrested sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : नाशिकची हायप्रोफाइल टोळी जेरबंद; तीन गुन्हेगारांना जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहरातील एन-१ भागात घरफोडी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला ७२ तासांत यश आले. याप्रकरणी नाशिक येथील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ६९ तोळ्यांच्या दागिन्यांसह एकूण ६६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. पकडलेली टोळी ही हायप्रोफाइल आहे. टोळीचा सूत्रधार कुख्यात आरोपी रोहन भोळे याला शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस, विविध बँकांचे कर्ज यामुळे त्याने साथीदारांसह शहरात मोठा डल्ला मारला होता.

ता. १३ जुलैला रात्री ८ ते ९.३० च्या सुमारास एन १ भागातील निखिल सुशील मुथा या व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी १०५ तोळ्यांचा ऐवज लांबवला होता. याची सिडको एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली होती. चोरट्यांनी कारमध्ये येत पाळत ठेवून खिडकीचे गज कटरने कापून घरात शिरत ही धाडसी चोरी केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करत होते.

दरम्यान, खबऱ्याने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना गुन्ह्यातील एक संशयित ऋषिकेश काळे हा सध्या रांजणगाव शेणपुंजी भागात असल्याची माहिती दिली. त्यावरून पथकाने सापळा रचून ऋषिकेशला ताब्यात घेतले. ऋषिकेशने त्याचे दोन साथीदार साजापूर चौकात येणार असल्याचे सांगितले. पथकाने साजापूर गाठत साथीदार आकाश कोठे आणि रोहन भोळे यांनाही कारसह ताब्यात घेतले.

यावेळी कारमध्ये सोने, हिरेजडित दागिने, चांदीचे दागिने असा ६० लाख ९२ हजारांचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी रोहन संजय भोळे (वय ३४, रा. फ्लॅट क्रमांक १२, जयप्रकाश सोसायटी, गंधर्वनगरी, नाशिक रोड, नाशिक) ऋषिकेश मधुकर काळे (२८, रा. फ्लॅट क्रमांक ३, गंधर्वनगरी, नाशिक) आणि आकाश दिनेश कोठे (२७, रा. मालधक्कानगर, देवळाई रोड, नाशिक) यांना अटक केली आहे.

आरोपींचे राहणीमान उच्च दर्जाचे

टोळीतील आरोपी ऋषिकेश काळे याचे शिक्षण बीई मॅकेनिकल झालेले आहे. तो इंग्लिश चांगले बोलतो. इतर दोन आरोपींचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. आरोपींचे राहणीमान देखील उच्च दर्जाचे असून स्कोडा कारचा वापर ते गुन्ह्यामध्ये करत असल्याने कोणाला संशयदेखील येत नाही.

गुुन्हा दाखल होताच ७२ तासांत उलगडा

आरोपींनी गुन्ह्यामध्ये कारचा वापर केला होता. पोलिसांनी या कारच्या मागावरून तपास केला. यामध्ये ही कार गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक आदी भागांत फिरल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेच्या राज्य लेव्हलच्या व्हॉट्सॲप ग्रुपची देखील आरोपींचा शोध घेण्यासाठी मदत झाली. यामुळे पोलिसांना ७२ तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.

आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल

आरोपी रोहन भोळेवर नाशिक, नाशिक रोड, उपनगर पोलिस ठाणे, गंगापूर, सिन्नर, ओझर आदी पोलिस ठाण्यांत घरफोडी, दरोडा, चोरी, फसवणूक असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर ऋषिकेशवर सिन्नर, गंगापूर आणि उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. रोहन हा शेअर मार्केटमध्ये इंट्रा डे मार्केटमध्ये लाखो रुपयांच्या लॉसमध्ये होता. त्याच्या विविध बँकांचे कर्ज थकीत आहे. यातून संशयितांनी मोठा हात मारण्यासाठी संभाजीनगर गाठले होते.

तीन दिवसांपासून शहरात मुक्काम

या टोळीने शहरात केलेला हा पहिलाच गुन्हा आहे. गुन्हा करण्यापूर्वी तीन दिवसांपासून टोळीचा शहरात मुक्काम होता. शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये फिरून ही टोळी रेकी करत होती. मोठे आणि स्वतंत्र बंगले टोळीचे टार्गेट होते. या बंगल्यावर पाळत ठेवून ही टोळी संधी साधून ऐवज लांबवत असल्याची याची मोंडस ओपरेंडी आहे. दरम्यान, १३ जुलैला निखिल मुथा यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत त्यांनी घरफोडी केली.

गुन्हे शाखेला एक लाखाचे बक्षीस

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, पीएसआय संदीप साळुंके, जमादार प्रकाश गायकवाड, बाळू लहरे, नवनाथ खांडेकर, अमोल शिंदे, सुनील बेलकर, श्‍याम आढे आणि तातेराव शिनगारे यांचे कौतुक करीत त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT