धरण परिसरात फ्लेमिंगोंचे आगमन झाले  sakal
छत्रपती संभाजीनगर

Nathsagar : ‘नाथसागर’च्या भेटीला आले फ्लेमिंगो!

धरणाच्या सौंदर्यात भर, यंदा दोन महिने उशिराने आगमन

सकाळ वृत्तसेवा

पैठण : नाथसागर (जायकवाडी) धरण परिसरात फ्लेमिंगोंचे आगमन झाले आहे. यंदा दोन महिने उशिराने ते दाखल झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केली आहे. सध्या परिसरात पाचशेहून अधिक फ्लेमिंगो असून पक्षीप्रेमी व पर्यटकांसाठी पर्वणी आहे.

युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. तेथून नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. सध्या ते येथील नाथसागर धरण क्षेत्रात आले आहेत. पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड वक्राकार केशरी चोच, गुलाबी लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी धरण परिसरासह विविध गावांच्या शिवारात पसरलेल्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर विहार करताना दिसत आहेत.

पाणलोट क्षेत्रातील पातळी कमी झाल्यानंतर जमिनीचा चराऊ भाग उघडा होतो. याचा अचूक अंदाज घेत स्थलांतरात अतिशय तरबेज असलेले हे पक्षी दाखल होतात. मासे, खेकडे, गोगलगाय, शंखशिंपले आदी मृदुकाय प्राणी, बेडूक व चिखलातील विविध कृमी- कीटक हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. हे पक्षी पाणवनस्पती व शेवाळावरही ताव मारत आहेत.

स्थलांतरित पक्षी नेहमी हवामानाचा अंदाज घेऊन धरण परिसरात येतात. यावर्षी हवामान बदलामुळे फ्लेमिंगोंच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता. आता पोषक वातावरण असल्याने फ्लेमिंगो नाथसागरावर येऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे धरण परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

- सुनील पायघन, पक्षी मित्र, पैठण

वेळापत्रक बिघडले!

यंदा नाथसागर धरण काठोकाठ भरले होते. पावसाळ्यानंतरही भूजल पातळी समाधानकारक असल्याने विसर्ग लांबणीवर पडले. त्यामुळे खाद्य उपलब्ध होत नसल्याने प्लेमिंगोंचे आगमन लांबणीवर पडले. आता उपसा होत असल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्र मोकळे होत आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT