national unity Oath taken Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : दौडमध्ये घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ

याप्रसंगी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

याप्रसंगी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला

औरंगाबाद : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त सोमवारी शहरात ‘राष्ट्रीय एकता दौड’ पार पडली. यावेळी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे सहभागींना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता मानवी साखळी तयार करण्यात आली. याप्रसंगी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौड आणि फिट इंडिया फ्रिडम रनची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी केले. सर्वांनी एकता व समानतेने राहण्याकरीता उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता’ची शपथ भागवत कराड यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक दयानंद कांबळे, गोकुळ तांदळे, सतीश पाठक, वसंतराव मंगलके, बापू घडामोडे, जालिंदर शेंडगे, मोहन आघाव, सुधाकर घुले, मोहम्मद ईरफानोद्दीन रईसोद्दीन, इम्रान जरीवाला, अशोक कायंदे, संजीवनी कायंदे, दिपक रूईकर, चरणजितसिंग संघा, अभय देशमुख, रुस्तुम तुपे, संतोष अवचार, रोहन टाक, राजेश पाटील, भारत रेड्डी, आदींची उपस्थिती होती. यासाठी लता लोंढे, सदानंद सवळे, अनिल दांडगे, सचिन बोर्डे, भिमा मोरे, हर्षकुमार यांनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT