Navratri 2024:  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Navratri 2024: रेणुका देवीचा मंदिर परिसर उत्सवासाठी उजळला, दीडशे वर्षांची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2024: फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे माहूरगड येथील रेणुका मातेचे पीठ असून गावातील महिलांनी एकत्र येत मंदिरात घटस्थापना केली आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. सध्या नवरात्रोत्सवामुळे रेणुका देवीचा मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

फुलंब्री-राजूर रस्त्यावर रिधोरा देवी गावाची १६१९ मध्ये स्थापना झालेली आहे. त्यानंतर काही वर्षाने येथे रेणुका देवीची स्थापना करण्यात आली. हजारो नागरिक येथे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येतात. देवीची ख्याती वाढल्यामुळे रिधोरा गावाच्या रिधोरा देवी असा उल्लेख केला जातो. गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पहिला मान स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब बाबाराव कोलते यांना मिळाला होता.

त्यानंतर गावागावात रिधोरा येथील रेणुका देवीची ख्याती पसरल्याने दररोज मोठी गर्दी भाविकांची होत असते. पूर्वी रिधोरा हे गाव भोकरदन तालुक्यात होते. सात-आठ वर्षांपूर्वी हे गाव फुलंब्री तालुक्यात समाविष्ट झाले. जालना आणि छत्रपती संभाजीनगर सीमेवर हे गाव असून भोकरदन, फुलंब्री, बदनापूर, सिल्लोड या चार तालुक्यांच्या सीमेवर रिधोरा देवी हे गाव आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून नऊ दिवस येथे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. नवरात्र महोत्सवात नऊ दिवस भाविकांना विविध सुविधांसाठी ग्रामस्थ पुढाकार घेतात.

परंपरा आजही कायम

नोकरीसाठी बाहेरगावी गेलेले नोकरदार, व्यावसायिक, नातलग तसेच लेकीबाळी येऊन मनोभावी देवीची पूजा करतात. ओटी भरण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

नवसाला पावणारी

रेणुका देवीच्या या मंदिराचा जीर्णोद्धार १९९२ मध्ये झाला. १९४७ नंतर या मंदिराच्या कळसाचे काम करण्यात आले. रिधोरा देवी माहूरगड येथील रेणुका मातेचे पीठ आहे.

रेणुका देवी मंदिराची वैशिष्ट्ये

रिधोरा देवी येथे रेणुका देवी मंदिरासमोर उंच दीपमाळ असून भाविकांच्या देणगीतून भक्तनिवास उभारण्यात आले आहे. येथे रोज सकाळ व संध्याकाळी महाआरती करण्यात येते. नवरात्र महोत्सवात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT