NEP implement graduate level from next year share syllabus in four days university board of studies meeting esakal
छत्रपती संभाजीनगर

NEP : पुढील वर्षापासून पदवीस्तरावर ‘एनईपी’ चार दिवसांत अभ्यासक्रम, विद्यापीठ अभ्यास मंडळाची बैठक

पुढील वर्षी सर्व पदवी अभ्यासक्रमांची रचना या धोरणाप्रमाणे करण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तरावरही नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. अभ्यासमंडळ अध्यक्ष, सदस्यांनी येत्या चार दिवसांत अभ्यासक्रम द्यावे, असे निर्देश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाने अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर चारही विद्याशाखेतील अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांची बैठक गुरुवारी (ता. दोन) घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांची प्रमुख उपस्थिती होती.

चारही विद्याशाखांचे जवळपास ११० अध्यक्ष, सदस्य ऑनलाइन व प्रत्यक्ष उपस्थित होते. प्रारंभी प्र-कुलगुरू डॉ. शिरसाठ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांची माहिती प्रास्ताविकात दिली. चारही अधिष्ठानांनी संबंधित विद्याशाखेतील अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, ‘‘विद्यार्थी केंद्रित म्हणून ओळखला जाणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची पदव्युत्तर स्तरावर यंदापासून २०२३-२४ आपल्या विद्यापीठाने यशस्वी अंमलबजावणी केली.

पुढील वर्षी सर्व पदवी अभ्यासक्रमांची रचना या धोरणाप्रमाणे करण्यात येईल. यासाठी सर्व अभ्यासक्रमाचे अध्यक्ष व सदस्यांनी लवकरात लवकर अभ्यासक्रम तयार करून द्यावा; अन्यथा विद्यापीठ प्रशासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशाराही कुलगुरू येवले यांनी दिला. कक्षाधिकारी आशिष वडोदकर, जयश्री कांबळे, डॉ. कैलास त्रिभुवन, जिज्ञासा दांडगे आदींनी प्रयत्न केले.

६६ विषयांचा नवीन अभ्यासक्रम

चार विद्याशाखेत मिळून एकूण ६६ अभ्यास मंडळे आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान (३३ अभ्यासमंडळे), मानव्यविद्या (१९) आंतरविद्या शाखा (१०) आहेत. यातील (१९) अभ्यासमंडळांनी अद्यापही अभ्यासक्रम जमा केलेले नाहीत. वाणिज्य शास्त्र विद्याशाखेच्या चारही अभ्यासमंडळांनी अभ्यासक्रम दाखल केले. ६ नोव्हेंबरपर्यंत संबंधित अभ्यास मंडळांनी अभ्यासक्रम जमा करावेत, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT