औरंगाबाद : स्वत:ची वैज्ञानिक संस्था आहे व त्या संस्थेत आपण शास्त्रज्ञ आहेत अशी थाप तर हा ठग मारीत होताच. पण लोक विश्वास कसा ठेवतील हेही त्याला सतावत होते.
मग या ठगाने नासाचे विविध कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड केले. ते संगणकाद्वारे एडीट केले. लोक विश्वास ठेवतील असे काही बदल त्यात त्याने केले. त्यानंतर फसवणुकीचा "उद्योग' करीत सुमारे सत्तावीसपेक्षा अधिक लोकांची अडीच कोटींची फसवणूक केली. केवळ झटपट पैसा कमविण्यासाठी त्याने फसवणूक सुरु केली होती.
अभिजित पानसरे (रा. नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे. या संशयित भामट्याला औरंगाबादेतील आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी नाशिकमधून दहा जानेवारीला बेड्या ठोकल्या. यानंतर आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली.
तेव्हा त्याने गोळा केलेली "माया' चैनीत घालविल्याची व इतर गरजेच्या वस्तू घेण्यात खर्च केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विविध ओळखपत्रेही जप्त केली. यात रॉ चा अधिकारी व इतर बड्या पदावर कार्यरत असल्याबाबत कागदपत्रे होती. नासाचा एक प्रकल्प मिळाल्याची थाप त्याने मारली.
आपली मे. सायन्स कुडोस ही संस्था आहे. या संस्थेला न्यूक्लीअर रिऍक्टर तयार करण्याचे नासाकडून कंत्राट मिळाले असे तो सांगत होता. प्रकल्पासाठी पैशांची नितांत गरज आहे. यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल. त्यात वाटेकरीही होता येईल अशी थाप त्याने मारली होती.
पण लोक कसे विश्वास ठेवतील हेही त्याला खटकत होते. म्हणून त्याने एक कलर प्रिंटर घेतला. यानंतर इंटरनेटवरुन त्याने नासाशी संबंधित व इतर काही संस्थांची माहिती जाणून घेत काही कागदपत्रे डाऊनलोड केली.
ती संगणकात एडीट करुन तिची प्रिंट काढत हुबेहुब कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही कागदपत्रे अनेकांना दाखवित त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. पैसा गुंतवू शकेल अशा व्यक्तींना जाळ्यात ओढत त्याने फसवणूक सुरु केली. अशाच पद्धतीने त्याने एक दोन नव्हे तब्बल सत्तावीपेक्षा अधिक लोकांना फसवून अडीच कोटींची माया मिळविली
अशी माहिती आर्थिक गुन्हेशाखेकडून देण्यात आली. विशेषत: त्याच्याकडे पंतप्रधान कार्यालय, रॉ तसेच आयपीएससंबंधित ओळखपत्रे आढळली. त्याने आणखी कुणा कुणाला फसविले याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.