कन्नड तालुक्यातील ८७ वाळूमाफियांना नोटिसा Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : कन्नड तालुक्यातील ८७ वाळूमाफियांना नोटिसा

प्रतिबंधात्मक कारवाई : कायदा, सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना ठाण्यात द्यावी लागेल हजेरी

राजानंद सुरडकर, कन्नड

कन्नड : अवैध वाळूच्या पैशांवर प्रबळ झालेल्या वाळू माफियांवर कायद्याचा वचक बसण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी संतोष गोरड यांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना तालुक्यातील ८७ वाळू माफियांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार ८७ वाळू माफियांना भादंवि कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्यात, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी दिली. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड म्हणाले, तालुक्यातील गौण खनिजांचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे.

त्यामुळे अनेक भागात भूजल पातळी खोल गेल्याने तीव्र पाणीटंचाई व नैसर्गिक समतोल ढासळत आहे. दंडाधिकारी म्हणून जे अधिकार प्राप्त आहेत त्यानुसार ही कारवाई केली. या नोटिसांना उत्तर देण्यासाठी या सर्वांना दंडाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे.

यातील जे कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशांना थेट तुरूंगात टाकण्याची तरतूद आहे. तसेच त्या हद्दीतील पोलिस ठाण्यात सकाळ, संध्याकाळ हजेरी लावावी लागणार आहे. या कारवाईसाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, करण जारवाल, प्रशांत काळे, राजेश्वर लोखंडे यांचे पथक कार्यरत आहे.

पिशोर पोलिस ठाण्याअंतर्गत

अंकुश गंगाधर खुर्दे, (रा. रामनगर), प्रवीण सासमकर, रवी साळुबा कोतकर (दोघे रा.नेवपूर), समाधान रामदास वाघ (रा.शेलगाव), रियाज शेख चाँद (रा.खोलापूर), अजिनाथ राजू टकले (रा. सारोळा), इत्तेशाम नासेर काजी (रा.नागापूर), मिलिंद एकनाथ पवार (रा. वाकी), अंजिम मुनशी कुरेशी, अब्दुल करीम नबी पटेल (दोघे रा. शेलगाव),

अर्जुन देविदास काळे (रा. पळशी खुर्द), मधुकर देवराव घाडगे (रा. साखरवेल), गजानन नारायण घुगे (रा. वासडी), सतीश कारभारी जाधव (रा.करंजखेडा), योगेश तेजराव मनगटे (रा. वाकोद), माधवराव सोनाजी जाधव (रा. जामडी जहागीर),

संतोष एकनाथ व्यवहारे, रोहित बद्री ठाकूर (रा. नादरपूर), विनायक शेषराव ढमाले (रा. जवखेडा बु.), बाळू तेजराव पवार (रा. चिंचोली लिंबाजी), सुरेश दगडू ढवळे (रा.रामनगर), राहुल रामराव हराळ (रा. जवखेडा),

विजय गोपीनाथ गायकवाड (रा. दिगाव खेडी), सुनील लक्ष्मण मोकासे, योगेश तान्हुबा आहेर, विजय गोपीनाथ गायकवाड (दोघे रा‌. दिगर), संदीप सांडू लोखंडे (रा. पळशी खु.), रोहित कैलास कोतकर (रा. नेवपूर), जगन्नाथ हरि पवार (रा‌. चिंचोली लिंबाजी), रघुवीरसिंग सुपडूसिंग राजपूत (रा.गौरपिंपरी), सचिन प्रभाकर निकम (रा. नादरपूर), विजय गोपीनाथ गायकवाड, सकाहरी कौतिक सुसुंद्रे (दोघे रा.दिगाव), सुनील लक्ष्मण मोकासे (रा.पिशोर) आदी.

कन्नड शहर पोलिस ठाण्यांतर्गत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

तन्वीर निहाल शेख, सागर मधुकर गायकवाड (रा.मक्रणपूर), विनोद जनार्दन बारगळ (रा.मुंडवाडी), शेख अस्लम शेख अजीमुद्दीन (रा. रेल), मोहम्मद युसूफ पठाण, तारेख खान नूर मोहम्मद खान (रा.रिठ्ठी), नाना गंगाधर शिरसाठ (रा.कन्नड), जावेद कासम खान पठाण, रऊफ शेठ शेख, मधु गायकवाड (रा. कन्नड),

दीपक लक्ष्मण गायकवाड, साहेबखान कासम खान (रा. कन्नड), शेख अशरफ अली मुजफ्फर, शेख अली अशरफ आली (रा. नेवपूर), अब्दुल जिया अब्दुल समद (रा. कन्नड), प्रदीप कचरू मोरे, बळीराम ज्ञानेश्वर जाधव, (रा. रेल), भाऊसाहेब अजिनाथ आदिक (रा. दाभाडी), सतीश विश्वनाथ खेडकर, नासेर अश्पाक शेख (रा.कन्नड) आदी.

देवगाव रंगारी पोलिस ठाण्याअंतर्गत

बाळासाहेब फकीरराव पवार (रा. शेवता), अमोल साईनाथ काळे (रा. ताडपिंपळगाव), मच्छिंद्र कचरू आगवाण (रा. पळसखेडा), संदीप सुभाष धाडबळे, योगेश जगन्नाथ कवडे (रा. खामगाव), शिवनाथ अंबादास मुळे (रा. देवगाव रंगारी),

पवन राजगोपाल दरक (रा.देवळी), सोमीनाथ किसन रावते, रायभान आहेर, किशोर हरिश्चंद्र आहेर, बालचंद्र कारभारी आहेर, सतीश कारभारी गिरटे, उस्मान सुभाष शेख (सर्व रा. माटेगाव), शिवा अशोक सोनवणे, प्रल्हाद शंकर ठोंबरे (रा. देवगाव रंगारी), शुभम घुले (रा. धुळे), गिरजीनाथ कोंडीराम गुणावत (रा. पिंप्री), राहुल पतंगराव जाधव (रा.कसाबखेडा), सागर अशोक उबाळे (रा. भायेगाव).

का बजावल्या नोटिसा?

अनेक वाळूमाफिया आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले असून प्रशासनावर हल्ले करत आहेत. अनेकांकडे ट्रॅक्टर, हायवा, जेसीबी आहेत. हे माफिया केवळ दंडात्मक कारवाईला बधत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.

या वर्षी ५० अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ९३ लाख २४ हजार दंड लावला. त्यापैकी ७२ लाख १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तरीही वाळूमाफिया निर्ढावलेले आहेत. म्हणून कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

कन्नड ग्रामीण ठाण्याअंतर्गत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

हर्षल लालसिंग पाटील (रा. वडोद), किरण राजेंद्र ठाकरे, राजेंद्र तुकाराम ठाकरे (रा.मठवाडी), नामदेव तुकाराम राठोड, सुभाष लक्ष्मण राठोड (रा. बनशेंद्रा), सुनील प्रकाश बनकर (रा. सायगव्हाण), सतीश विश्वनाथ खेडेकर (रा. टापरगाव), कौतिक जाधव (रा.हतनूर), अबीद सईद शेख (रा.सायगव्हाण), किरण बाळू गाजरे (रा.हतनूर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT