sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime News : कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकूहल्ला

‘सिनेस्टाइल’ झटापटीनंतर गुन्हे शाखेने केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वाँटेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेल्यानंतर या कुख्यात आरोपीने गुन्हे शाखेच्या पथकावरच चाकूहल्ला केला. २५ डिसेंबरला जटवाडा रोड परिसरात हा खळबळजनक प्रकार घडला. गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसाने या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. शेख वाहेद शेख मोहसीन (वय २०, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड, हर्सूल) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सिडको पोलिसांना शटरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी शेख वाहेद हा जटवाडा रोडवरील सुधीर हनुमाननगर परिसरात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके यांना मिळाली होती. या माहितीवरुन एपीआय शेळके, संजय राजपूत, विलास मुठे आणि रामदास गव्हाणे हे आरोपी वाहेदला पकडण्यासाठी गेले होते. पोलिसांना पाहताच आरोपी वाहेदने पलायन केले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दिशेने वाहेद पळाला. पळत असताना त्याने पोलिसांच्या दिशेने विटांचे तुकडे फेकत जखमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दगड लागल्याने जमादार गव्हाणे जखमी झाले.

आरोपी वाहेद हा इमारतीच्या स्वच्छतागृहात लपला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहेदने स्वतः जवळील चाकू काढत गव्हाणे यांच्यावर वार केला. गव्हाणे यांनी वार चुकवल्याने ते बचावले. तेव्हा वेळीच त्याला शेळके आणि इतरांनी जेरबंद करण्यात यश मिऴवले. या प्रकरणी आरोपी वाहेदवर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT