sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : मदतीपासून एक लाख शेतकरी वंचित

अवकाळी पाठोपाठ जिल्ह्यात आता ई-केवायसीचाही फटका

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील तब्बल ४ लाख १ हजार ४४६ बाधित शेतकऱ्यांना २२६ कोटी ९८ लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली. मात्र, विविध कारणांमुळे केवळ ६० टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली आहे. बॅंकेची केवायसी नसल्याने तब्बल एक लाख शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित राहिले आहेत.

जिल्ह्यामध्ये गतवर्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने कहर केला होता. त्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट आणि दोनऐवजी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसानभरपाई देण्याची घोषणा करीत ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत केली; तसेच विशेष बाब म्हणून जुलै, ऑगस्ट २०२२ दरम्यान सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटीही मदत दिली. सुरुवातीच्या टप्प्यात मदत निधीचे वाटप सुरू असतानाच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातही अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख ९४ हजार ३८६ शेतकरी बाधित झाले आणि त्यांचे ३ लाख ७७८.२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाने या नुकसानीपोटी नव्या निकषानुसार २२६ कोटी ९८ लाख रुपयांची मदत दिली. परंतु, ही मदत देत असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या प्रोत्साहन लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाइन प्रणालीतून मदत वर्ग करण्याचे धोरण राबविले.

  • अशी आहेत कारणे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी नसणे, शेतकऱ्यांचे आधार नंबर चुकीचे असणे, बँक पासबूक आणि आधार क्रमांकावरील नावात बदल, आधार क्रमांक बँकेशी संलग्न नसणे यासह विविध कारणांमुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे बाधीत शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

  • केवायसीचा मुख्य अडसर

ऑनलाइन प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने मागील आठ महिन्यांत केवळ ६० टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा झाली. ४ लाख ४४ हजार ३०७ बाधित शेतकऱ्यांपैकी ३ लाख १० हजार ७९ शेतकऱ्यांचा डेटा अपग्रेड करण्यात आला आहे. त्यापैकी २ लाख ४४ हजार ५१६ शेतकऱ्यांच्या खात्यात १७० कोटी ९२ लाख ६२ हजार २७३ रुपये जमा झाले आहेत. साधारण १ लाख ९९ हजार ७९१ शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत.

  • गारपीटग्रस्त चार हजार शेतकऱ्यांना मदत

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यात ३५ हजार १५ शेतकरी बाधित झाले होते. यापैकी ५ हजार ९२१ शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ३ हजार ७५९ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत २ कोटी ३८ लाख ६३ हजार ७७५ रुपये जमा करण्यात आले आहेत तर ६ हजार ३८९ शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT