छत्रपती संभाजीनगर - परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या राज्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नव्या शासन निर्णयानुसार, यावर्षीपासून २० ऐवजी ४० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ऑक्टोबर २०१८ पासून सुरु करण्यात आली. मंत्रीमंडळाने सोमवारी (३१जुलै) घेतलेल्या निर्णयानुसार, या योजनेचा लाभ पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी १० ऐवजी ३० विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी १० जागा कायम ठेवण्यात आल्या आहेत.
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर सुरु केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी
https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सुधारीत अंतिम मुदत १३ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे.
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, मुळ कागदपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रतींसह पडताळणीसाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांच्या विभागीय सहसंचालक कार्यालयात १४ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करायची आहेत.
अभियांत्रिकी, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्रशिक्षण विभाग तर, कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी अभ्यासक्रमासाठी उच्चशिक्षण विभागात संपर्क साधण्याचे आवाहन दोन्ही विभागातर्फे करण्यात आले आहे.
असे आहेत पात्रतेचे निकष
शिष्यवृत्तीसाठी इच्छुक उमेदवार, आई, वडील, पालक हे भारताचे नागरिक आणि महाराष्ट्राचे अधिवासी असावेत. उमेदवारासह पालकांचे किंवा कुटूंबियाचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
परदेशातील शैक्षणिक संस्थेचे २०२३ मधील टाईम्स हायर एज्युकेशन किंवा क्वाकरेली सायमंड्स यांचे वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत बंधनकारक आहे. योजनेच्या अटी व शर्थी, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्यपद्धती याबाबतची माहिती शिष्यवृत्तीसाठीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.