sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : बिडकीन परिसर शहराचे नेक्स्ट डेस्टिनेशन ; डीएमआयसीमुळे विकास आणि गुंतवणुकीच्या अनेक संधी

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या माध्यमातून शेंद्रा परिसर विकसित झाला. त्यापाठोपाठ बिडकीन परिसरातही अल्पवधितच झपाट्याने भरभराट आली. या भागातही डिएमआयसीमुळे बिडकीनचे चेहरा-मोहराच बदलून गेला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या माध्यमातून शेंद्रा परिसर विकसित झाला. त्यापाठोपाठ बिडकीन परिसरातही अल्पवधितच झपाट्याने भरभराट आली. या भागातही डिएमआयसीमुळे बिडकीनचे चेहरा-मोहराच बदलून गेला. टुमदार घरे असलेले हे गावाने कात टाकत झपाट्याने विकसित होणारे शहर बनले आहे. भविष्यात येणारे नवे उद्योग,गुंतवणुकी बिडकीन परिसर हे शहराचे नेक्स्ट डेस्टिनेशन बनणार आहे.बिडकीन जवळून जाणारा सोलापूर-धुळे महामार्ग आणि छत्रपती संभाजीनगर ते पुण्यासाठी तयार होणारा महामार्ग हा बिडकिन वासियांचे मोठी कनेक्टीव्हीटी देणारा ठरणार आहे. यामुळे बिडकिनची आणखीनच भरभराट होणार आहे.

शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर दूर असलेल्या बिडकीन येथे डीएमआयसीने आठ हजार एकर जमीन संपादित करून विकसित केली आहे. यामुळे नव्या उद्योगासाठी ही आठ हजार एकराचा भूखंड उपलब्ध आहे. यात नवीन उद्योग आणण्यासाठी डीएमआयसीसह ऑरिक सिटीतर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. रस्त्याची कनेक्टीव्हीटीमुळे आतापर्यंत उद्योग आलेले नाही, मात्र आता नव्याने पैठण रोडचे काम सुरु झाले आहे. यासह इतर कामेही सुरु झाल्यामुळे ही अडचण दूर होणार आहे. शेंद्रा-बिडकीन-वाळूज अशी कनेक्टीव्हीटीची मागणी उद्योजकांतर्फे सातत्याने होत आहे. यात कदाचित ही मागणीवर सरकार सकारात्मक असल्याने हा प्रश्‍नही मार्गी लागण्याची शक्यता आहे.

वाळूज,शेंद्रा नंतर उद्योजकांसाठी सर्वाधिक जागा उपलब्ध असलेला भाग म्हणून बिडकिनकडे बघितले जात आहे. लघु उद्योगापासून विविध क्षेत्रातील उद्योजकांकडून या परिसरातील जागेसाठी विचारणाही केली जात आहे. बिडकीनचा झपाट्याने विकास झाला. या परिसरात जमिनीला सोन्याचा भाव येत आहे. या भागातील जमीनीचे व्यवहार वाढले. या गावात राष्ट्रीयकृत बँकांनी शाखा उघडत या विकासात आमचाही सहभाग असल्याचे दाखवून दिले. यासह जायकवाडी जलाशय, संत एकनाथाचे नाथमंदिर यासह या भागात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे.

यामुळे या भागात अनेकांना गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केवळ उद्योजकच नव्हे तर निसर्ग प्रेमीही या भागात गुंतवणूक आणि राहण्याच्या दृष्टीने विचार करीत असल्याने भागात घर घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सर्व सविधा बिडकिन परिसरात उलब्ध झाल्याने अनेकजण या भागाला पहिली पसंती देत आहे. त्याच दृष्टीने नवनवीन प्रकल्पही सुरु राहत आहे. घराची मागणी आणि विकसित होणाऱ्या भागात प्रत्येकाला आपले हक्काचे घर असावेत असे वाटत आहे. यामुळे घरांची मागणीत वाढ होत असल्याचेही परिसरात नागरिकांनी सांगितले.

संभाजीनगरात टेक्नोक्रॉफ्ट ग्रुपचा ३५० कोटींची गुंतवणूक

औद्योगिक व बांधकाम उत्पादनात आघाडीवर असलेल्या टेक्नोक्राफ्ट ग्रुपने बिडकिन येथील ऑरीकच्या ३५० कोटींची गुंतवणूक केली आहे. ॲल्युमिनियम व स्टील फॉर्मवर्क उद्योगात कंपनीचे मोठे नाव आहे. २७ ऑगस्टला या कंपनीचे भुमिपूजन झाले. या कंपनी जवळपास एक हजार लोकांना रोजगार देणार आहे. ३००००० स्वेअर फुटांवर या कंपनीचा प्रकल्प उभा राहत असून त्यांचे काम अंतिम टप्‍प्यात आले आहे. बांधकाम,पायाभूत सुविधा, तेल आणि वायू,ऑटोमेटिव्हसह विविध प्रकाराच्या उद्योगांना ही टेक्नोक्रॉफ्ट कंपनी सेवा देते. मार्चपासून महिन्यापासून या कंपनीचे प्रत्यक्षात उत्पादन सुरु होणार आहे. या प्रकल्पासाठी सीएमआयने पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT