Manoj Jarange sakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange : जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीतून विरोध ; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवार (ता. चार) पासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिला हाेता. मात्र, जरांगे यांचे जुने सहकारी, अंतरवाली सराटी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि काही ग्रामस्थांकडून त्यांना विरोध करत अंतरवालीत उपोषणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी सोमवारी (ता. तीन) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात जरांगे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अाता ते अाठजूनपासून अांदाेलन करणार अाहेत.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा महिन्यांत मनोज जरांगे यांनी तीनवेळा मोठे बेमुदत उपोषण केले. पहिल्या उपोषणादरम्यान एक सप्टेंबर २०२३ रोजी पोलिस आणि आंदोलक यांच्यात धुमश्चक्री झाली. त्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले.

त्यानंतर पुन्हा दोनवेळा बेमुदत उपोषण केले. शिवाय त्यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे कूच केले होते. मात्र, वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेसंदर्भात नोटिफिकेश जारी केल्यानंतर ते परत आले होते. मात्र, या नोटिफिकेशची अंमलबजाणी न झाल्याने ते तिसऱ्यांदा अंतरवालीत उपोषणास बसले. त्यानंतर जरांगे पुन्हा मंगळवारपासून (ता. चार) बेमुदत उपोषणास बसणार होते.

मात्र, त्यांच्या या आंदोलनामुळे जातीय भेद वाढत असल्याने सामाजिक सलोखा बिघडत चालला असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या आंदोलनाचा येथील ग्रामस्थांना त्रास होत आहे; तसेच गावातील विकासकामे ठप्प झाली आहेत. उपोषणस्थळ सभामंडपाचे काम मंजूर झाले असून, येथे काम सुरू करता येत नाहीये. उपोषणस्थळाजवळील मंदिरात नियमित पूजापाठ करण्यास अडचणी येतात; तसेच गर्दीमुळे गावातील महिलांना मंदिरात जाता येत नाही. शिवाय मंत्र्यांचा ताफा, पोलिस बंदोबस्त, भोंग्याचा आवाज यामुळे येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

आता पेरणीचे दिवस येणार असून, या उपोषणाचा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने जरांगे यांच्या उपोषणास परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे जरांगे यांचे जुने सहकारी रमेश तारख, डॉ. किरण तारख यांच्यासह अंतरवाली सराटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती विष्णुपंत वाघमारे, सदस्य नीता सतीश तारख, सविता रतन गाडगे, रेणुका सोमनाथ दखने व सविता छगन कोटंबे यांनी केली आहे. निवेदनावर ५० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सुरवातीला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा ही मराठा आरक्षणाची होती. या मागणीला ग्रामस्थ आणि सर्व समाजातून पाठिंबा मिळाला. मात्र, आता या आंदोलनात राजकारण शिरले असून, जरांगे हे विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याची भाषा करत असल्याने त्यांचा राजकीय हेतू दिसून येत आहे. शिवाय जातीय तेढही वाढले आहे. या गावातील एकोपा बिघडत असून, जातीय तेढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांना उपोषणाची परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आमचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच राहील.

— डॉ. रमेश तारख, मनोज जरांगे यांचे जुने सहकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT