Aurangabad Corona News 
छत्रपती संभाजीनगर

एकुलत्या एक मुलाचा कोरोनाने मृत्यू, अन्नत्याग करुन आईनेही सोडला जीव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. तालुक्यात दरदिवशी १०० हुन अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : कळंब (Kalamb) तालुक्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे.ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबे उद्धवस्त झाली. अनेकांनी आपला जीव गमावला. अशीच घटना तालुक्यातील अंदोरा येथे घडली. कोरोनावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) न मिळाल्याने अंदोरा येथील चाळीस वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. आपला एकुलता एक मुलगा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आईला कळताच अन्नत्याग करत आईनेही (वय-६२) जीव सोडला.कोरोनाच्या दुसऱ्या (Corona Second Wave) लाटेत कोरोनावर वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकजण दररोज मृत्युमुखी पडत आहेत. अशा अत्यंत दुःखदायक घटना दरदिवशी घडत असल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Osmanabad Latest News Mother Dies After Listening Son Death News Kalamb)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. तालुक्यात दरदिवशी १०० हुन अधिक रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३५  जणांचा जीव गेला आहे. सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पाय रोवले आहे. ऑक्सिजन बेड मिळत नाही, कोरोना झाला की जीव जातोय या भीतीपोटी काही जण रुग्णलयात जात नाही. अंगावर दुखणं काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे .तालुक्यातील अंदोरा येथील एका तरुण शेतकरी कुटूंबातील एकुलता एक मुलाचा २३ एप्रिल रोजी कोरोनामूळे मृत्यु झाला. त्या पाठोपाठ कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या आईने मुलाच्या विरहाने अन्न वर्ज केले आणि ऑक्सिजन लेवल कमी झाली. कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला या धक्क्याने आईनेही  सोमवार (ता.तीन) प्राण सोडला. तरुण युवकाला कोरोना झाला. बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने प्राथमिक औषधोपचार करून तुळजापूरला ऑक्सिजन बेड मिळत असल्याची नातेवाईकांनी माहिती घेऊन तेथे दाखल केले. कोरोना तपासणीत पत्नी व आई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू होते. मुलाची ऑक्सिजन लेवल सुधारत नसल्याने ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गृहविलगीकरणात उपचार सुरू असलेल्या आईला समजली. ६२ वर्षीय आईने अन्न वर्ज केले. यातच त्यांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु ऑक्सिजन लेवल कमी होत गेल्याने अखेर त्यांचा एकुलत्या एक मुलाचा मृत्युचा विरह सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT