Pankaja Munde sakal
छत्रपती संभाजीनगर

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जवळपास १० वर्षांच्या कालावधीनंतर भाजपच्या मुख्य प्रवाहात सक्रिय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा पहिलाच दसरा मेळावा शनिवारी (ता.१२) श्री क्षेत्र सावरगाव घाट येथे होत आहे. यापूर्वीच्या मेळाव्यांत पंकजा मुंडे यांनी वारंवार परखड आणि स्पष्ट विधाने केल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या यंदाच्या मेळाव्यात काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या वतीने दरवर्षी दसरा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेकदा राजकीय भूमिकांचे सूतोवाचही केले जाते. मध्यंतरी जवळपास १० वर्षे भाजपच्या राज्यातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या मुंडे यांनी या मेळाव्यांमध्ये आक्रमक विधाने करून खळबळ उडवून दिली होती.

जवळपास दशकभराच्या विजनवास संपवून पंकजा मुंडे आता विधानपरिषदेत पोचल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात केवळ पंकजा यांचाच नाही तर महायुतीच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला.

त्यात येत्या महिनाभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी भाजपसह इतर कुठल्या पक्षाचे नेते हजेरी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG: इंग्लडने सामन्यात घेतली पाकिस्तानला न झेपणारी आघाडी; फलंदाजांनी केली इंग्लंडची नौका पार

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Ratan Tata: इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत... टाटा समूहाचे साम्राज्य विदेशात किती पसरले आहे?

Latest Maharashtra News Updates : रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

SCROLL FOR NEXT