Papaya Sakal
छत्रपती संभाजीनगर

Papaya: पपई १०० रुपयांत कुठे अडीच, कुठे पाच किलो! शेतकऱ्यांना आर्थिक फटका

आवक वाढल्याने दर घसरले, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा

चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई. पपईचे दर सध्या घसरले आहेत. शहरात कुठे १०० रुपयांत अडीच किलो तर कुठे पाच किलो दराने विक्री होत आहे. दर घसरल्यामुळे ग्राहकांची मज्जा पण शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आवक वाढल्यामुळे दर कमी असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. दर कमी असल्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

पपई खाण्याचे फायदे

शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते

पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो.

वजन घटवण्यास मदत

पपईमध्ये १२० कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आजारांशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा २०० टक्के अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

मधुमेहींसाठी गुणकारी

पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ ८.३ ग्रॅम साखर असते. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

सांधेदुखीपासून आराम मिळतो

पपईमध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.

पचन सुधारते

जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.

मासिक पाळीचा त्रास कमी होतो

अनियमित मासिक पाळी तसेच या काळातील त्रास समस्या दूर करण्यासाठी पपई उपयुक्त आहे.

कर्करोगापासून बचाव होतो

ॲन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन कर्करोगापासून बचाव करते.

तणाव कमी होतो

धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

पपईच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी दर घसरले आहेत. ग्राहकी मोठ्या प्रमाणात आहे.

—अमोल मांडवे,विक्रेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT