ashok chavan sakal
छत्रपती संभाजीनगर

'पक्षीय भूमिका बाजूला ठेऊन मराठवाड्यासाठी एकत्र येण्याची गरज'

संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : माझे नेहमीच मराठवाड्याच्या (Marathwada) विकासासाठी झुकते माप राहिले आहे. पुढे ही राहील. त्यासाठी सर्वांनी पक्षीय भुमिका बाजुला ठेऊन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांनी व्यक्त केले. कुंभेफळ (ता.औरंगाबाद) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात आपल्या उद्घाटनपर भाषणात श्री.चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) होते. यावेळी रोजगार व हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare), जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार सुभाष झांबड, डॉ.कल्याण काळे, नामदेव पवार, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, वाकुळणी देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज तावरे, बाजार समिती सभापती जगन्नाथ काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामुकाका शेळके, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीरभाऊ मुळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, सुरेंद्र साळुंके, कुंभेफळच्या सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंचा मनीषा शेळके, ग्रामसेविका संगिता तायडे आदींची (Aurangabad) व्यासपीठावर उपस्थिती होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 3 कोटी रूपये खर्चातून निपाणी-टाकळी-कुंभेफळ ते जालना महामार्ग व 2 कोटी रुपये खर्चातुन शेंद्रा-कुंभेफळ-भालगाव या जोडरस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचे, तर जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके यांच्या स्वेच्छा निधीतून कोट्यावधी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आणि ग्रामपंचायतीच्या विविध विकास निधीततून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळावरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. श्री. चव्हाण म्हणाले, की कुंभेफळ गावात प्रवेश केल्यानंतर व येथील ग्रामसचिवालय इमारत पाहिल्यानंतर मी ग्रामपंचायत आवारात आहे की नगरपालिका याचे भान उरले नाही. येथील ग्रामपंचायतीने दवाखान्यासाठीची स्वतंत्र इमारत उभी करून ग्रामपंचायतीचे स्वतःचे छोटेशे हाॅस्पिटल असू शकते हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. किंबहुना हा राज्यातील पहिला बहुमान ठरावा. सोबतच येथील विकास कामांची जंत्री मोठी आहे. सर्व प्राथमिक सुविधा ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आल्या आहेत ही अभिमानास्पद बाब असुन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल म्हणावे लागेल. महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वी कार्य करीत आहेत. श्री. ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला विशाल दृष्टिकोन ठेवणारा मुख्यमंत्री लाभला आहे. कोरोना महामारीने दोन वर्ष खुप वाईटाचे गेले आहेत.

विकास कामांची गती ही खुप मंदावली होती. मात्र, या काळात प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा होता. त्यामुळे वैद्यकीय सेवेसाठी कुठेही निधीची कमतरता या सरकारने भासु न दिल्यानेच आपण मोठी जीवितहानी टाळू शकलो. या काळात स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष घेतलेली मेहनत सर्वांनी अनुभवली आहे. आता हळूहळू परिस्थिती सुधारत असताना विविध विकासात्मक निर्णय घेण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. पक्षीय राजकारण बाजुला ठेऊन विकास खेचून आणणारे नेतृत्व हवे. कंत्राटदाराने चांगली कामे व ती ही वेळेवर करावीत. अन्यथा कारवाई साठी तयार रहावे. विमा कंपन्या व्यवस्थित कामे करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याकडुन अपेक्षित मदत मिळणे ही माफक अपेक्षा आहे. सरकारचे या गंभीर बाबींकडे बारीक लक्ष आहे. अतिवृष्टीने नुकसान झाल्याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. मंत्री भुमरे म्हणाले, की आपल्या विभागा मार्फत घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची माहिती देत, आपल्या विभागामार्फत तालुक्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. आमदार बागडे यांनी मतदारसंघातील अतिवृष्टीनेे दयनीय रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांकडुन निधीची मागणी करत तसे श्री. चव्हाण यांना रीतसर निवेदनही दिले. तत्पूर्वी, विलासबापु औताडे, डॉ. काळे, सुधीरभाऊ मुळे यांची ही भाषणे झाली. यावेळी रविंद्र काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकर्डे, करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भीमराव डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महाजन, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, संदीपान पवार, मुरलीअण्णा चौधरी, अशोक शिंदे आदींसह जिल्हा परिषदचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT