छत्रपती संभाजीनगर : केरळमध्ये कोरोना संसर्गाच्या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. महापालिकेने गंभीर दखल घेत आयएलआय व सारी सदृश रुग्णांची कोविड चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना मंगळवारी (ता. १९) झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आल्या.
केरळ राज्यात कोरोना संसर्गाचा नवा व्हेरिएन्ट आढळून आला आहे. त्यासोबतच राज्यातही रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची उपस्थिती होती. यावेळी रुग्णालयातील यंत्रणा, यंत्रसामग्री, औषधसाठा, मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. मेल्ट्रॉन हॉस्पिटल, इओसी पद्मपुरा, सिडको एन-११, सिडको एन-८, नेहरूनगर या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, डॉ. राठोडकर यांची उपस्थिती होती.
अशा आहेत सूचना
आयएलआय, सारी सदृश रुग्णांची कोविड चाचणी करावी.
कार्यक्षेत्रात आयएलआय, सारी साथरोगाबाबत सर्वेक्षण करावे.
कोविड चाचणीसाठी पुरेशा कीट उपलब्ध ठेवाव्यात.
ऑक्सिजन सिलिंडर भरून ठेवावेत.
आरटीपीसीआर पॉझिटिव्ह चाचण्या आलेल्या रुग्णांच्या जिनोम सिक्वेसिंग चाचणीसाठी नमुने पाठवावेत.
हे करा
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
हात वारंवार स्वच्छ पाणी व साबणाने धुवावेत.
खोकलताना शिंकताना हात रुमाल किंवा कपड्याने तोंड झाकून घ्यावे.
नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवावेत.
खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांपासून दूर राहा.
पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या.
धूम्रपान टाळा, पुरेशी झोप घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.