छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्तपदांची समस्या गंभीर आहे. असे असताना पूर्वी शाळेत पदे भरण्यास उत्सुक असणारे संस्थाचालक आता पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबवावी लागत असल्याने रिक्त पदे भरण्याबाबत उदासीन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच की काय जिल्ह्यात शेकडो पदे रिक्त असताना पवित्र पोर्टलवर रोस्टर तपासून केवळ २७ शाळांनीच पद भरतीच्या जाहिराती अपलोड केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २ हजार ११९ शाळा, खासगी अनुदानित ९२७ शाळा, महापालिका ८७, नगर पालिका २५, अशा एकूण ३,१५८ शाळा आहेत. जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये सध्या ११ हजार ४३७ शिक्षक कार्यरत असून शंभरहून अधिक पदे अद्यापही रिक्त आहेत. यात मात्र सुरवातीला प्राथमिक श्रेणीत काही शाळांकडून जाहिरात देण्यात आली होती. पण त्रुटीमुळे ती रद्द करण्यात आली. मागील महिन्यात संचमान्यतेनंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसाठी समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली होती. समायोजनाची प्रक्रिया राबविल्यानंतर केवळ २७ शाळांनी भरतीसंदर्भात जाहिरात दिली तर बाकीच्या शाळांनी जाहिरात देण्यास टाळाटाळ केली आहे. या दोन्ही परिस्थिती संस्थाचालकांनी फायदा करून घेतला आहे.
पवित्रमुळे गैरप्रकाराला लगाम
पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेपूर्वी संस्थाचालक रिक्त जागा भरण्यासाठी उत्सुक असायचे किंवा पदे रिक्त होण्याची वाट बघत होते. कारण रिक्त पद भरताना आर्थिक व्यवहाराला संधी मिळत होती. एका-एका पदासाठी लाखो रुपयांचा व्यवहार होत असे. त्यात आर्थिक व्यवहारानंतर वशिलेबाजीने पदे भरण्याचा प्रकारही सर्रासपणे चालत होता. परंतु, आता पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया होत असल्याने या गैरप्रकारांवर लगाम लागला आहे.
संस्थाचालक संधीची वाट पाहून...
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले की, संस्थेतील रिक्त जागांसाठी प्रत्येक जागेसाठी पवित्र पोर्टलवरुन संस्थेकडे तीन-तीन उमेदवारांना पाठवले जाणार आहे. त्यामुळे या जागांमधून आर्थिक व्यवहाराला संधी मिळेल. या आशेने अनेक संस्थाचालकांनी रिक्त जागा भरण्यास टाळाटाळ केली आहे. तसेच रिक्त जागा असूनही पद भरतीची जाहिरात न देण्याचे कारण म्हणजे सरकार बदलल्यानंतर वशिलेबाजीने नातेवाइकांना भरती करता येईल, असा संधीची देखील अनेक संस्थाचालक वाट पाहून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.