राजपूत यांनी राजकीय शक्तीचा पुरेपूर वापर केलेला आहे. प्रस्तावित आमदारांचे महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत.
औरंगाबाद : कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत MLA Udaysingh Rajput यांच्या संस्थेस राजकीय क्षेत्रातील व्यक्ती म्हणूनच पाच महाविद्यालये देण्यात आलेले असून त्यामधील चापानेर येथील महाविद्यालयास दिलेल्या इरादा पत्रास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात Aurangabad Bench Of Bombay High Court आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणातील सुनावणीत खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला Justice S.V.Gangapurwala व न्या. एम. जी. सेवलीकर Justice M.J.Sewalikar यांनी संस्थेस मिळालेल्या इरादा पत्राचे भवितव्य न्यायालयाच्या न्यायप्रविष्ठ याचिकेच्या न्यायनिर्णयावर अवलंबून असेल, असा अंतरिम आदेश देत प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिवादी म्हणून राज्य शासन Maharashtra, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक औरंगाबाद, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु Babasaheb Ambedkar Marathwada University व संस्थेमार्फत स्वतः उदयसिंह राजपूत यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. पुढील सुनावणी ता. १६ जुलै रोजी होणार आहेया प्रकरणी हनुमान सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव शरद नारायणराव पवार यांनी अॅड. संदीप राजेभोसले यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार शैक्षणिक २०२१-२२ पासून नवीन महाविद्यालयाकरिता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कन्नड तालुक्यातील चापानेर या गावात कला, वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्यास आमदार उदयसिंह राजपूत हे अध्यक्ष असलेल्या नागद येथील श्रद्धा शैक्षणिक व बहुद्देशीय प्रतिष्ठान या संस्थेच्या चित्राई महाविद्यालयास इरादा पत्र दिलेले आहे.petition filed against mla udaysingh rajput educational institutes inn aurangabad bench
राजपूत यांनी राजकीय शक्तीचा पुरेपूर वापर केलेला आहे. प्रस्तावित आमदारांचे महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत. याचिकाकर्त्यांच्या महाविद्यालयाचा प्रस्ताव श्री.राजपूत यांच्या शैक्षणिक संस्थेपेक्षा चांगला असताना कुठलेही सबळ कारण न देता केवळ राजकीय हेतुने प्रेरित होऊन व श्रद्धा शैक्षणिक बहुद्देशीय प्रतिष्ठान यांचा प्रस्ताव हा शासन निकषात बसत नसतानाही त्यांचे संस्थेस इरादापत्र देण्यात आलेले आहे. या व इतर मुद्द्यांवर श्री. राजपूत यांच्या संस्थेच्या इरादा पत्रास आव्हान दिले आहे. या प्रकरणी खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. संदीप राजेभोसले यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. सुधीर घोंगडे, अॅड. गायत्री राजेभोसले, अॅड.दिनेश चव्हाण, अॅड. आकाश बागल, अॅड. समृद्धी देशमुख आदींनी सहकार्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.