pm swamitva yojana Property cards of 3500 villages ready Survey by drone sakal
छत्रपती संभाजीनगर

स्वामित्व योजना : ई- प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? राज्यात २३ हजार गावांत ड्रोनद्वारे झालंय सर्वेक्षण

स्वामित्व योजना : राज्यात २३ हजार गावांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण

- शेखलाल शेख

औरंगाबाद : जमिनीच्या मालकीहक्काबाबत नेहमीच वाद उद्भवतात. यात गरिबांच्या जमिनींवर बळजबरीने कब्जा केल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. याचा विचार करून केंद्र सरकारने २४ एप्रिल २०२० पासून पथदर्शी प्रकल्पाद्वारे देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्यास सुरवात केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात २३ हजार ४७१ गावांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यातील तीन हजार ६६८ गावांची प्रॉपर्टी कार्ड तयार केली आहेत. देशात एक लाख ६२ हजार २२९ गावांत सर्वेक्षण करून ५० हजार ३१५ गावांतील मालमत्ताधारकांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाली आहेत. पण बहुतांश ठिकाणी त्यांच्या वितरणाची प्रतीक्षा आहे. स्वामित्व योजना २४ एप्रिल २०२० पासून सुरु झाली. यात मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टीचे अधिकृत नोंदणी तयार करण्यावर भर देण्यात आला. या प्रकल्पासाठी हरियाना, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड ही राज्ये निवडण्यात आली. त्यानंतर पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेशातील काही गावांचा समावेश करण्यात आला. देशभरात २०२५ पर्यंत गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे.

राज्यनिहाय सर्वेक्षण झालेल्या गावांची संख्या अशी : उत्तर प्रदेश ७२ हजार ५७, मध्य प्रदेश ः ३२ हजार १७२, महाराष्ट्र ः२३ हजार ४७१, उत्तराखंडः७ हजार ५८१, हरियाना ः६ हजार २६०, राजस्थानः ४ हजार ५३३, आंध्र प्रदेश ः२ हजार ७२३, कर्नाटकः२ हजार ६६४, छत्तीसगड ः २ हजार ४४२.

महाराष्ट्रातील कामगिरी

-३४ जिल्ह्यांतील २३ हजार ४७१ गावांमध्ये सर्वेक्षण

- तीन हजार ६६८ गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार

-स्वामित्व योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप

ई- प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांकडे आजही आपले घर, जमिनीबाबत कागदपत्रे उपलब्ध नाहीत. यात विशेषतः गावठाणामध्ये राहणाऱ्यांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमीन आणि घरांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केल्यानंतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. जेणेकरून कागदपत्रे नसलेल्यांना निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील. या ओळखपत्राला ‘ई-संपत्ती कार्ड, ‘ई प्रॉपर्टी कार्ड किंवा भूमी प्रमाणपत्र’ म्हणता येईल.

राज्यात सर्वेक्षण झालेल्या गावांची संख्या

औरंगाबाद- ९५४

अहमदनगर-९३२

अकोला- ८२२

अमरावती-१०७५

बीड- २२७

भंडारा- ७३४

बुलडाणा- १२०१

चंद्रपूर- ११५९

धुळे- ४०२

गडचिरोली-३३०

गोंदीया- ३१७

हिंगोली- २५०

जळगाव- ७८०

जालना- ३७१

कोल्हापुर- ७८६

लातूर- ५७३

नागपूर- १४३०

नांदेड- ६३९

नंदुरबार- ५०४

नाशिक- १०८१

उस्मानाबाद- ५१२

पालघर- २३५

परभणी- २७३

पुणे- १५६९

रायगड- ९७१

रत्नागिरी- ४१७

सांगली- ४६५

सातारा- ४५८

सिंधुदुर्ग- ४५

सोलापुर- ४०५

ठाणे- ७३४

वर्धा- ८४३

वाशीम- ६७२

यवतमाळ- १३०५

एकूण- २३,४७१

(आकडेवारी २२ जुलै २०२२ पर्यंतची)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT