Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

आई,बाबांना पाहाताच चिमुरडीने फोडला हंबरडा; पोलिसांमुळे मायलेकी भेटल्या

पोलिसांनी दाखवलेली तत्परता, माणुसकी चिमुकलीला मायेची ऊब देणारी ठरली.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : तीन वर्षांची चिमुकली आपल्या गल्लीतील मित्र सवंगड्यासोबत खेळता खेळता गर्दीने फुललेल्या आठवडे बाजारात येऊन भरकटते..., इकडे आईवडील त्याचा शोध घेता-घेता थकून पोलिस ठाण्याची वाट पकडतात, तर दूसरीकडे भरकटलेल्या चिमुकलीला सोबत घेऊन पाचोडचे (ता.पैठण) (Paithan) पोलिस कर्मचारी त्याच्या मातापित्याचा शोध घेत असताना एक - दुसऱ्यास भेटतात. अन् तीन तासांपासून आई-वडिलांपासून दुरावलेली चिमुकली आईला पाहताच त्याच्या कुशीत विसावते. तोच आई-वडिलही चिमुकलीला पाहून डोळ्यांतून आनंदाश्रू (Aurangabad) गाळत आपल्या चुकीचे प्रायश्चित घेत चिमुकलीला कडेवर घेऊन घराचा रस्ता पकडतात. अन् तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर काळजाचा ठोका चुकलेले मातापित्याच्या जीवात जीव येऊन घराचा रस्ता पकडतात. ही ह्रदयस्पर्शी घटना येथील आठवडे बाजारात रविवारी ( ता. दोन) पाहावयास मिळाली. (Police Efforts Fruitful, Girl Child Finally Reached Her Mother Father In Pachod Of Aurangabad)

रविवारी पाचोडचा आठवडे बाजार असल्याने सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस नाईक प्रशांत नांदवे, पवन चव्हाण, संतोष चव्हाण बाजारात गस्त घालत असताना त्यांना गावातील भाऊसाहेब शेळके याने एक तीन वर्षीय चिमुकली बेवारस रित्या ओक्साबोक्सी रडून आई बाबासाठी टाहो फोडत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ती वाट चुकल्याचे हेरून तिला सोबत कडेवर घेतले. बाजारात तोबा गर्दी, त्याचे आईबाबा शोधण्याचा यक्ष प्रश्न उभा राहिला. इकडे आपली चिमुकली गायब झाल्याने आईवडील तीन तासांपासून थकले होते. अखेर निराश होऊन ते मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात निघाले असता समोर देवदूत बनलेले पोलिस चिमुकलीला घेऊन रस्त्याने जाताना त्यांच्या दृष्टीस पडले. चिमुकलीने आईबाबांना पाहताच हंबरडा फोडला.

इकडे आईवडिलांना ही मायेचा पाझर स्वस्थ बसु देईना.'त्या' माता - पित्यानी पोलिसांना समोरील चिमुकली आपली असुन शेजारच्या मुलांसोबत खेळता- खेळता ती भरकटुन बाजारात आली. आमचे त्याकडे झालेले दुर्लक्ष, चुकी आमचे लक्षात आली. आम्ही पोलीसांना दोष देत असलो तरी पोलिस माणसाच्या वेशात देवरुपी माणसं आहेत, असे म्हणत चुक स्वीकारत त्यांनी चिमुकलीला कवटाळले. पोलिसांनी त्यांना समज देऊन मुलांची काळजी घेण्याची समज दिली. पोलिसांनी दाखवलेली तत्परता, माणुसकी चिमुकलीला मायेची ऊब देणारी ठरली. चिमुकलीचे वडील सलीम कय्युम शेख (रा.पाचोड) याने पोलिसांच्या सतर्कतेमुळेच आपली मुलगी सापडल्याने सांगुन पोलिस हे मानवीवेशात देव माणसं असल्याचे सांगुन त्याने पाचोड पोलिसांचे आभार मानले व चिमुकलीला घेऊन आपले घर गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT