प्रा. राजन शिंदे खून प्रकरण sakal
छत्रपती संभाजीनगर

राजन शिंदेंच्या खुनाला कौटुंबिक कलहाची किनार! पत्नीसह तिघांचे जबाब

मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. राजन शिंदे यांचा खून कौटुंबिक कलहातून झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस यंत्रणा आली आहे. या प्रकरणाच्या तपासाला गुन्हे शाखेने आता गती दिली आहे.

अनिल जमधडे

औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. राजन शिंदे यांचा खून कौटुंबिक (Rajan Shinde Murder) कलहातून झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस यंत्रणा आली आहे. या प्रकरणाच्या तपासाला गुन्हे शाखेने आता गती दिली आहे. शनिवारी (ता. सोळा) शिंदे यांच्या पत्नी मनीषा यांना पहिल्यांदाच पोलिसांच्या वाहनातून चौकशीसाठी नेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. दुसरीकडे घराजवळच्या (Aurangabad) विहिरीमध्ये शस्त्र टाकल्याच्या संशयावरून विहिरीतून पाणी अन् गाळाचा उपसा सुरू करण्यात आला आहे. पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. रविवारी या खुनाचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी (Crime In Aurangabad) सांगितले. दरम्यान, गुन्हे शाखेसह एसआयटीचे पथक वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत. सिडको, एन-दोन भागातील प्रा. राजन शिंदे यांचा खून होऊन सहा दिवस उलटले. तरीही पोलिस थेट मारेकऱ्यापर्यंत पोचले नाहीत.

गुन्हे शाखेसह एसआयटीचे पथक वेगवेगळ्या दिशेने तपासचक्रे फिरवत आहे. शिंदे यांच्या नजीकच्या नातेवाइकांसह मित्रांकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. पोलिसांची पथके वेगवेगळ्या शहरातदेखील जाऊन नातेवाइकांची चौकशी करीत आहेत. सध्या तरी कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गुन्ह्याची उकल करण्यावर पोलिसांचा भर आहे. मारेकऱ्याने कोणताही पुरावा हत्येदरम्यान मागे ठेवलेला नाही. म्हणून पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अडचणीचा पोलिसांना सामना करावा लागतोय. शिंदे यांच्या हत्येमागील कारणे तपासली जात आहेत. मानसोपचार तज्ज्ञांची देखील पोलिसांनी मदत घेतलेली आहे. एकंदरीत या हत्येचा तपास आणि त्यामागील निष्कर्ष कधी समोर येईल याची नागरिकांना देखील उत्सुकता लागून आहे.

विहिरीतून उपसा करताना अडचणी
पोलिसांनी शनिवारी शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीचे पाणी उपसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षापासून ही विहीर उपयोगात नाही. विहिरीत सध्या ३५ फूट पाणी आहे. हे पाणी उपसण्यासाठी सकाळी अकरापासून प्रयत्न सुरू करण्यात आले. सुरवातीला ठेकेदारामार्फत विहिरीवर असलेली जाळी तोडण्याचे काम सुरू झाले. मात्र मध्येच वेल्डिंग मशीन खराब झाल्याने काम खोळंबले. नवीन मशीन आणेपर्यंत तासाभराचा वेळ गेला. दरम्यान, पाणी उपसण्यासाठी जुन्या पद्धतीचा पाच एचपीचा पंप आणला. त्याची जोडजाड करेपर्यंत दुपारचे दोन वाजले. मात्र, विहिरीतील पाणी पाहता मोटारींची संख्या वाढविणे गरजेचे होते. त्यामुळे दुपारनंतर आणखी दोन प्रत्येकी तीन एचपी क्षमतेच्या सबमर्सिबल पंपांची व्यवस्था करण्यात आली. विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने तो मोटारीच्या फुटबॉलला अडकत होता. त्यामुळे मोटारींचा पाणि फेकण्याचा वेग कमी होता होता, तर अनेक वेळा या मोटारी बंदही पडत होत्या. विहिरीतील पाणी काढण्यासाठी पोलिस आणि मनपाच्या पथकांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. विहीर उपसण्यासाठी पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. दुपारी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. परंतु अग्निशमन विभागाकडे असलेल्या पंपाने विहिरीतील पाणी उपसणे शक्य नसल्याचे या पथकाने सांगितले. त्यानंतर पुन्हा प्रभाग सहाचे उपअभियंता आर. एन. संधा यांच्याकडे विद्युत पंपाची मागणी करण्यात आली. संधा यांनी कनिष्ठ अभियंता गायकवाड आणि श्री. चौधरी यांनी तातडीने विद्युत पंप उपलब्ध करून दिले. पथदिव्यांच्या डीपीतून वीजपुरवठा घेऊन पाणी उपसा सुरू केला आहे. असे असले तरीही या पंपाद्वारे विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी अधिक काळ लागणार असल्याचे लक्षात येताच शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित यांना आणखी पंप देण्याची सूचना केली. त्यानुसार पंडित यांनी विहिरीची पाहणी करून पाच अश्वशक्तीचा आणखी एक पंप उपलब्ध करून दिला. या पंपांद्वारे विहिरीतील पाणी उपसा होण्यास मदत होणार आहे. परंतु विहिरीतील पाणीसाठा व झऱ्यांद्वारे येणारे पाणी याचा विचार केला तर विहिरीतून पाण्याचा उपसा होण्यास रविवारचा संपूर्ण दिवस लागण्याची शक्यता आहे.

तिघांची कसून चौकशी
प्रा. शिंदे यांची हत्या झाल्यापासून दररोज कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. तरीही अद्याप ठोस निर्णयावर पोलिस येऊ शकले नाहीत. शनिवारी (ता. सोळा) दुपारी सव्वादोनच्या सुमारास शिंदे यांच्या पत्नी मनीषा यांना पहिल्यांदा घराबाहेर चौकशीसाठी पोलिस वाहनातून नेण्यात आले. मनीषा यांची तासभर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे मुलगी आणि आत्या यांचीही चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT