Pradnya Satav  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Pradnya Satav : चर्चेला पूर्णविराम! विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांना दुसऱ्यांदा संधी

सकाळ वृत्तसेवा

Hingoli News : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून येथील डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे महासचिव के.सी. विणुगोपाल यांनी सोमवारी (ता. १) पत्र जारी केले आहे. डॉ. सातव यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळत आहे.

प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता. कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल चर्चा सुरू होती. त्यातच विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्याविरोधात काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार करीत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विरोधकांना सहकार्य केल्याचा आरोप केला होता.

या आरोपामुळे मोठी राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सातव यांना विधान परिषदेची संधी मिळणार की नाही, यावर चर्चा सुरू होती. परंतु, वेणुगोपाल यांनी आज पत्र जारी करून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेनुसार सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

सातव यांना दुसऱ्यांदा विधान परिषद उमेदवारीची संधी मिळाल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या दावेदार नसणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या कळमनुरी मतदारसंघात पुन्हा वेगळ्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.

गोरखे यांना उमेदवारी; हिंगोलीमध्ये जल्लोष!

हिंगोली : भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेसाठी अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मातंग समाजाच्यावतीने येथील गांधी चौकात सोमवारी सायंकाळी जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी केली. या जल्लोषात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

मातंग समाजातील व्यक्तीला पहिल्यांदाच विधान परिषदेवर उमेदवारीची संधी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाने अमित गोरखे यांना उमेदवारी देऊन समाजाला न्याय दिला आहे, अशी भावना व्यक्त करीत समाजबांधव सायंकाळी पाचच्या सुमारास गांधी चौकात एकत्र आले. एकमेकांना पेढे भरवून आतषबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

SCROLL FOR NEXT