Verul Caves sakal
छत्रपती संभाजीनगर

National Tourism Day : बघा, हिरवे हिरवे गार गालिचे!

‘केल्याने देशाटन चातुर्य वाढे फार’ असे म्हटले जाते. ते खरेच आहे. सोबत पर्यटक वाढले तर स्थानिकांना रोजगारही मिळतो. पर्यटनाची राजधानी असलेल्या आपल्या जिल्‍ह्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.

प्रकाश बनकर

- ८८८८८५९४७०

‘केल्याने देशाटन चातुर्य वाढे फार’ असे म्हटले जाते. ते खरेच आहे. सोबत पर्यटक वाढले तर स्थानिकांना रोजगारही मिळतो. पर्यटनाची राजधानी असलेल्या आपल्या जिल्‍ह्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. पण, ते येथे सरासरी केवळ दीड दिवस मुक्काम करतात. त्यांचा मुक्काम वाढावा, पर्यटकांची जिल्‍ह्याच्या दारावरची टक-टक अजून वाढावी, यासाठी काय करता येईल याचा घेतलेला हा आढावा.

जगभरातील पर्यटक छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात येतात; पण ते वेरूळ, अंजिठा, दौलताबाद आणि बीबी-का-मकबरा याच्या पलीकडे काही पाहत नाहीत. डोंगराच्या कुशीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्याला निसर्गाने भरभरून दिले.

निसर्गाने दिलेले हे दान येथे येणाऱ्या पर्यटकांनीही पाहावे, केवळ लेण्या-किल्ला पाहण्यासाठी नाही तर येथील निर्सग पाहण्यासाठी पर्यटकांनी भेटी द्याव्या, या दृष्टीने वनविभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोकण आणि पूर्वविदर्भाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वन पर्यटन नाही; मात्र कन्नड, म्हैसमाळ परिसराकडे वनविभागाने लक्ष दिले तर निश्चितच येथेही जागतिक दर्जाचे वनपर्यटन विकसित होईल.

त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती हवी. नेमका याच गोष्टीचा अभाव आपल्याकडे दिसतो. कन्नड तालुक्यातील क्षेत्रात गौताळा अभयारण्य आहे. कन्नड तालुक्यामधील १७ गावांतील वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश आहे. अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. वेगवेगळी झाडे, प्राणी, पक्षी, झरे लक्ष वेधून घेतात.

गार-गार म्‍हैसमाळ

महाबळेश्वर, चिखलदऱ्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्‍हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे. मात्र, म्‍हैसमाळला जाण्याच्या रस्‍त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने गेलेला वाहनधारक पुन्हा या रस्त्याने जाण्याचे धाडस अजिबात करीत नाही. महेशमाळचा रस्ता जरी चांगला केला तरी पर्यटक वाढणार आहे. पण, अजूनही जिल्हा प्रशासनाला योग्य रस्ता करता आला नाही.

जायकवाडी म्हणजे पक्ष्यांची वाडी

जायकवाडी जलाशयावर जवळपास साडेतीनशेहून अधिक देशविदेशातील पक्ष्यांची मांदियाळी असते. हजारो मैलाचा प्रवास करीत हे विदेशी जायकवाडीवर येतात. सकाळी आणि सायंकाळी पक्ष्यांचा किलबिलाट असतो. दुर्मिळ अशा पक्ष्यांच्या प्रजातीही या ठिकाणी आढळून येतात. यात विशेष करून फ्लेमिंगोची शाळाच भरते. अशाच प्रकारे शहरातील सलीम अली सरोवर आणि सुखना जलाशयावर विविध पक्षी आढळून येतात. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT