Pralhad Dhanawat sakal
छत्रपती संभाजीनगर

Pralhad Dhanawat : रानात धावणाऱ्या प्रल्हादचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दबदबा

सकाळ वृत्तसेवा

लहानपणी गावाकडे उनाड रानात, चिखलात तसेच डोंगर माथ्यावर धावणारा प्रल्हाद आज विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रॉसकंट्री चॅम्पियनशिप स्पर्धेत आपला दबदबा राखून आहे. धावण्याच्या उत्तम कामगिरीतूनच प्रल्हाद रामसिंग धनावत यांनी भारतीय सेना दलात हवालदारपदी मजल मारली असून लवकरच नाईक सुभेदारपदी विराजमान होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बेंदेवाडी गावातील प्रल्हाद रामसिंग धनावत हे लहानपणी अनवाणी पायी शेतात धावत. पावसाळा सुरू झाला की ते गावाजवळ असलेल्या गणेश गड डोंगरावर रोज धावत असत. प्रल्हाद यांना लहानपणीच आपसूक धावण्याचे बाळकडू मिळाले. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘पायका’ या स्पर्धेत तीन किलोमीटर शर्यतीत धावण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल मारली.

मात्र त्यांना यात पदके मिळाली नाहीत. शेतकरी कुटुंबातून आलेले प्रल्हाद यांची घरची परिस्थिती अशी साधारण, घरी सहा भावंडाचा परिवार असून त्यातील ते सर्वात मोठे. यामुळे वडिलांना सोबत त्यांच्यावरही घर सांभाळण्याची जबाबदारी आली. यामुळे त्यांनी २०१२ला भारतीय सेनेत भरती होण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून धावण्याचा सराव असल्या कारणाने त्यांना या भरती प्रक्रियेत कसलीच अडचण आली नाही.

भारतीय सेनेत रुजू झाल्यावर त्यांची पहिली पोस्टिंग मध्यप्रदेश मध्ये भारतीय सेनेच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये झाली. यावेळी ट्रेनिंगच्या दरम्यान ते धावण्यात अव्वल असत. ही गोष्ट सैन्य अधिकाऱ्यांनी हेरली आणि त्यांना एक वेगळा सराव करण्यासाठी संधी दिली. यात त्यांनी स्वतःचा शंभर टक्के देत ते अधिकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत गेले.

यात सैन्य अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये ते सहभागी होत प्रथम क्रमांक मिळवत गेले. यात त्यांना सर्वोत्तम बेस्ट कॅडेट पुरस्कारही मिळाला. दरम्यान, लहानपणी तीन किलोमीटर धावत असलेले प्रल्हाद हे नंतर पाच, दहा आणि कालांतराने ४२ किलोमीटर, क्रॉसकंट्री, फूल मॅरेथॉन धावू लागले.

यात त्यांनी आंतरराष्ट्रीय ५० किलोमीटर मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक, साऊथ एशियन मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक, राष्ट्रीय क्रॉसकंट्री चॅम्पियनशिपत सुवर्ण, राज्यस्तरीय क्रॉसकंट्री चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, राष्ट्रीय हाफ मॅरेथॉन असे आतापर्यंत विविध ५६ पदके पटकाविले आहे.

सैन्य दलात त्यांनी पहिले २०१९-२०ला लोणावळा येथे झालेल्या सर्विस क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक, २०२०ला राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक, २०२०-२१ चंडीगडला झालेल्या सर्व्हिसेस क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक, राष्ट्रीय क्रॉस कंट्रीत सुवर्णपदक तर २०२३ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या ५० किलोमीटर अल्ट्रा वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक पटकाविले आहे.

या पदकांमुळे भारतीय सेनेच्या वतीने बेस्ट कॅडेट म्हणून पुरस्कारही देण्यात आलेला आहे. तसेच त्यांना हवलदारपदी त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. आजही ते वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पुणे येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटमध्ये सराव करत आहे.

(शब्दांकन - सुनील इंगळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT