Aurangabad Rain esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Rain|औरंगाबादच्या लोहगाव, पाचोड, कायगावात पाऊस अन् गारा

पैठण व गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट झाली.

ज्ञानेश्‍वर बोरुडे, हबीबखान पठाण, जमील पठाण

लोहगाव/पाचोड/कायगाव (जि.औरंगाबाद) : लोहगावसह (ता.पैठण) (Paithan) परिसरात मंगळवारी (ता.२८) दुपारून वातावरणात एकदम बदल होऊन विजाच्या कडकडाटात वादळी पाऊस व गारा (Hailstorm) पडल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिके फळबागाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोहगाव परिसरात वातावरणात बदल झाला असून मंगळवारी सकाळपासून आकाश ढगानी झाकाळुन गेलेले होते. दहा वाजेनंतर अधुनमधून सुर्यनारायणचे दर्शन झाले. दुपारून मात्र आकाशात अचानक ढगांच्या काळोख निर्माण होऊन लोहगाव, ब्रम्हगव्हान, तोडोंळी, गाढेगावपैठण, मावसगव्हाण, लामगव्हाण, मुलानीवाडगाव, ढाकेफळ, तारूपिंपळवाडी, शेवता, विजयपुर, ७४जळगाव आदी गावात विजाचा कडकडाटाच्या आवाजात वादळी वाऱ्यासह (Rain In Aurangabad) जोरदार पाऊस व गारपीट झाल्याने खरीप हंगामातील शेतशिवारात काढलेला कांदा, तूर, मठ, मका व रंब्बी हंगामातील (Aurangabad) लागवड केलेला कांदा, लसूण, ज्वारी, गहू, हरबरा, पिके, मोसंबी, आंबा, केळी, फळबागाचे नुकसान झाले तर शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, महिला, जनावरे, झोडपले आहेत. (Rain And Hailstorm In Aurangabad District)

Rain In Lohgaon Village Of Aurangabad

जवळपास अर्धातास जोरदार पाऊस झाला असून शेतातील वाफे, सरी, पिकात पाणी साचले. या पावसामुळे लोहगाव आठवडी बाजार विस्कळीत होऊन सखल भागात पाणी चिखलाने व्यापारी, जनतेची त्रेधातिरपीट उडून गारामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने हुडहुडी भरली होती. दरम्यान या अवकाळी पाऊस गाराने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी सुरेश मिसाळ, भगवान तेजिनकर,प्रभाकर तांबे आदींनी केली आहे. (Aurangabad weather Update)

पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी (ता.२८) दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोडसह (ता. पैठण) परिसरात वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी पाच मिनिटे जोरदार गारपीट झाली. (Hailstorm in Marathwada) पाचोडसह मुरमा, बोडखा, थेरगाव, लिंबगाव, हर्षी, वडजी , दादेगाव, खादगाव , रांजणगाव दांडगा आदी ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे सोंगणीस आणि तुरीच्या तर बहरलेल्या ज्वारी, गहु व हरभरा पिकांस फटका बसला. एवढेच नव्हे तर ताणावर घेतलेल्या मोसंबीच्या बागाचे ताण मोडून बहरलेले आंबा व मृग बहराच्या फळास छिद्र पडून मोठी हानी झाली. त्यातच बहरत असलेले मोसंबी व आंब्याचेही मोठे नुकसान झाले.

परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यानी धास्ती घेतली होती. सोमवारी सकाळी अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. (Aurangabad Rain) यांत पाच मिनिटे गारपीट झाली. काही ठिकाणी ज्वारीच्या तर काही ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारीचा खच पडल्यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला. बहरलेल्या मोसंबी (Sweet lemon) व आंब्याचा (Mango) मोहर गळुन उत्पादनावर परिणाम होण्याचे चिन्हे स्पष्ट झाले. परंतु पावसासह गारपिट पाच मिनिटानंतर बंद झाल्याने कोठेही जिवित्तहानी झाली नाही. पावसाच्या उघडीपनंतर अनेकांनी गारा गोळा करून त्याचा आस्वाद घेतला.

अवकाळी पावसाने शेतशिवार ओलेचिंब

कायगाव (ता.गंगापूर) (Gangapur) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जनेसह गारपीटचा दमदार पाऊस झाला. त्या अवकाळी पावसाने शेतशीवार ओलेचिंब होऊन शेतकऱ्यांची अवकळा केली आहे. नवीन कायगाव येथील आठवडी बाजारात अचानक आलेल्या धोधो पावसाने व्यापारी लोकांची भाजीपाला माल झाकण्यासाठी तारांबळ उडाली. तर खाऊ विक्रेतेची शेव, गोडेतेल आदी खाद्यपदार्थ भिजली. विक्रेतेच्या मालात पाणीच पाणी आणि सर्वत्र चिखल झाले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. नवीन कायगाव, अंमळनेर, लखमापूर, भिवधानोरा आदी गाव शिवारात अर्धातास चाललेल्या गाराच्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर ऊसतोड सुरू असलेल्या शेतातून उसाच्या बैलगाडी, टँक्टर बाहेर रोडपर्यन्त काढण्यात मोठी हालअपेष्टा झाल्यात. पावसामुळे ऊसतोडणीस व्यत्यय येत असल्याने ऊसतोड कामगारांना नाईलाजाने दुपारीच कोपीवर परतावे लागले. वादळी वाऱ्याने अनेकांच्या कोपीचे पाचट उडून गेल्याने कोपीत पावसाचे पाणीच पाणी झाले. कोपीत चिखल, दारी चिखल आणि गारव्यामुळे ऊसतोड कामगारांचे प्रचंड हाल झाले आहे.

वादळाच्या फटक्याने अनेक शेतकऱ्यांच्या झाडांची शेंडी, फांद्या तुटल्या आहेत. तर काही ठिकाणी लहान-मोठे झाडे उन्मळून पडली आहेत. चारा पिके आणि काढणी आलेली तूर अनेक ठिकाणी आडवी पडल्याचे चित्र आहे. सध्या कांदा लागवड चालू असलेल्या शेतात अनेकांनी वाफेचे रान घोळून ठेवले आहे. आता ते रान पावसाने भिजल्याने कांदा (Onion) लागवडीस कठीण जाण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी पट्ट्या पाडल्या आणि रान (वाफे) घोळण्याचे बाकी होते. त्यांची या अवकाळी पावसामुळे चांगलीच अवकळा होणार आहे. (Heavy rain and hailstorm damaged crop in Maharashtra)

बेमोसमी पाऊस आणि रोजच्या बदलत्या वातावरणामुळे शेती पीके धोक्यात आली आहेत. सध्या हर्वेस्टरने तूर काढणीला वेग आले आहे. पावसामुळे दोन-चार दिवस तूर काढणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरी फटक्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.

- पांडुरंग वाघ , शेतकरी, अगरवाडगाव ता.गंगापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT