Water Stock 
छत्रपती संभाजीनगर

पावसाने गाठली सरासरी, वैजापूर तालुक्यात जलसाठा समाधानकारक

भानुदास धामणे/दीपक बरकसे

वैजापूर (जि.औरंगाबाद) : सतत अवर्षणग्रस्त असणाऱ्या वैजापूर तालुक्यात यंदा वरुणराजाने जून महिन्याच्या सुरवातीपासूनच दमदार बॅटिंग केल्याने पावसाने तीन महिन्यातच वार्षिक सरासरी गाठली. यामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसंचय झाला आहे. शिवाय पावसाळा संपण्यास महिन्याभराचा अवधी शिल्लक असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यांत आणखीनही भर पडणार आहे.

आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे काम कमी होणार असून रब्बी हंगामही जोमात राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पातही पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरवात केली आहे. प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १३.२९० दलघमी इतकी असून क्षमतेच्या १९.१९ टक्के म्हणजेच ४.००२ दलघमी इतका जलसंचय प्रकल्पात जमा झाला आहे.

यापैकी २.३०७ दलघमी इतका जलसाठा उपयुक्त असल्याची माहिती नांदूर मध्यमेश्वरचे सी.आर. मतसागर यांनी दिली. याशिवाय तालुक्यातील इतर प्रकल्पातील आकडेवारी पुढीलप्रमाणे : बोरदहेगाव म.प्र. : एकूण क्षमता १३.२४० दलघमी/ उपलब्ध पाणी साठा ८.५२ दलघमी (५७.४० टक्के), कोल्ही मध्यम प्रकल्प एकूण क्षमता (३.२४०)/ उपलब्ध पाणी साठा ३.६६९ (१०० टक्के), मन्याड साठवण तलाव : क्षमता ४.७५ दलघमी साठा/ उपलब्ध पाणी साठा ४.७५ दलघमी (१०० टक्के), बिलवणी लघु प्रकल्प एकूण क्षमता ०.९६० दलघमी/उपलब्ध पाणीसाठा ०.९६० (१०० टक्के), खंडाळा लघु प्रकल्प : एकूण क्षमता ०.५६१दलघमी/ उपलब्ध पाणी साठा ०.५६१(१००टक्के), सटाणा लघु प्रकल्प : क्षमता १.३८० दलघमी साठा /उपलब्ध पाणी साठा ०.६०१ दलघमी (३३.१३ टक्के), गाढेपिंपळगाव लघु प्रकल्प : क्षमता २.०१७ साठा/उपलब्ध पाणी साठा १.८०६ (८६.९९ टक्के), जरूळ लघु प्रकल्प : क्षमता १.३८०/ उपलब्ध पाणी साठा १.३८० (१०० टक्के), वांजरगाव कोल्हापुरी बंधारा :क्षमता २.१५० दलघमी / उपलब्ध पाणी साठा २.१५० दलघमी (१०० टक्के).

पिकांचे नुकसान
तसेच शहरासह तालुक्यात रविवारी (ता.सहा) झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकासान झाले. ऊस, कपाशी, तुर, बाजरी व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील म्हस्की येथील शेतकरी कडू सांवत यांच्या शेतामध्ये ऊस व मका उभे पिकांचे नुकसान झाले असून तालुक्यातील सावखेडगंगा व गोदावरी नदीच्या काठावरील शेतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पडझड होऊन नुकसान झाल्याची दिसत आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT