sonography  Sakal
छत्रपती संभाजीनगर

सिल्लोडला आरोग्य यंत्रणा झोपेतः बोगस दवाखान्यांची दुकानदारी

सोनोग्राफी केंद्रांच्या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सचिन चोबे

मुलींचा जन्मदर घटत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने सोनोग्राफी केंद्रांच्या स्टिंग ऑपरेशन करण्याचे आदेश असतानाही शहरासह तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी होत नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर खासगी दवाखाने, क्लिनिकच्या नुतणीकरणाकडेही यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेच शहरात बोगस कारखान्यांची दुकानदारी फोफावली आहे. गर्भलिंग निदान चाचण्यांचे सिल्लोड कनेक्शन समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशिवर टांगली गेली आहे.

शहरातील उपजिल्हा रूग्णालयांतर्गत सुमारे अठरा सोनोग्राफी केंद्रे कार्यान्वित आहेत. यामध्ये काही मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांचा समावेश आहे. तर तालुक्यात अजिंठा येथे एक सोनोग्राफी केंद्र आहे. तालुक्यात वैद्यकीय व्यवसायासाठी सुमारे १०४ डॉक्टरांनी दवाखान्यांची रितसर नोंदणी केली आहे.

मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन गृह कायद्याच्या नियमानुसार ज्या दवाखान्यांची नोंदणी झाली आहे. त्यांना प्रत्येक तीन वर्षानंतर पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांच्या नुतणीकरणाचा प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात येतो.

परंतु तालुक्यातील फक्त ६५ दवाखान्यांनीच नुतणीकरणाची प्रक्रिया पुर्ण केली आहे. तर अनेक दवाखान्यांनी नुतणीकरण न केल्यामुळे त्यांना दोन वेळेस नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकारेच शहरात खासगी दवाखान्यांच्या नुतणीकरणाचे प्रस्ताव उपजिल्हा रूग्णालयामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जातात. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सोनोग्राफी केंद्रांसह सुमारे ८१ दवाखाने व क्लिनिक आहेत. परंतु सिल्लोडला किती खासगी दवाखान्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन)चा कालावधी संपला. व किती दवाखान्यांनी नुतणीकरण प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रस्ताव

सादर केले याची माहितीही उपजिल्हा रूग्णालय प्रशासनाकडे नाही. आरोग्य यंत्रणाच व्हॅटिलेंटरवर आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यांच्या आडून दुकानदारी करणाऱ्या निर्ढावलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांचे उद्योग सुरूच आहे.

तपासणीच्या आदेशाला पथकाचा खो...

सोनोग्राफी केंद्र तसेच मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांची प्रत्येक तीन महिन्यानंतर नियमितपणे तपासणी करण्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आहे. यासाठी शहरातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने २२ एप्रिल रोजी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. पथकात डॉ. अर्चना बिऱ्हारे, डॉ. मीनाक्षी अंधाळकर, डॉ. राम मोहिते, कैलास कंगने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु एक महिना होत आला असताना अद्यापही शहरातील एकाही सोनोग्राफी केंद्रांची तपासणी झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Stock Market Crash: शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा! कंपनीचे मालकच विकत आहेत शेअर्स, गुंतवणूकदारांनी काय करावं?

IND vs NZ: विराटच्या खेळीवर संजय मांजरेकर नाराज; म्हणाले कारकीर्दितील सर्वात खराब शॉट

Bala Nandgaonkar: चक्क राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार! बाळा नांदगावकर यांनी का केली ही भविष्यवाणी?

Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

SCROLL FOR NEXT