शास्ती, विलंब शुल्कात ७५ टक्के सूट  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : थकबाकीदारांना दिलासा; शास्ती, विलंब शुल्कात ७५ टक्के सूट

आजपासून अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेचे शाश्‍वत उत्पन्न म्हणजे मालमत्ताकर. मात्र, या कराची वसुली समाधानकारक नसल्याने थकीत मालमत्ता कराचा आकडा वाढत जाऊन मालमत्ता कराची थकबाकी सुमारे ७४३ कोटींवर गेली. थकलेल्या कर वसुलीला वेग यावा यासाठी थकलेल्या मालमत्ता करावरील शास्ती आणि विलंब शुल्कात ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशावरून महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेच्या वर्धापन दिनापासून म्हणजेच बुधवार (ता. आठ) पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यासाठी मालमत्ताधारकांनी थकीत कर एकरकमी भरला तरच या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

गेली दीड दोन वर्ष कोरोनात गेली. आता कुठे परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे दिसत असतानाच पुन्हा ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास अडचणी येत आहेत. यानुषंगाने काही नागरिकांनी या संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदने दिली होती. या निवेदनाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी सोयीचे जावे यासाठी पालकमंत्री देसाई यांनी थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ७५ टक्के सूट देण्याचे आदेश महापालिका प्रशासकांना दिले होते.

त्यानुसार प्रशासक श्री. पाण्डेय यांनी महापालिकेच्या वर्धापनदिनापासून म्हणजे बुधवार (ता. आठ) थकीत मालमत्ता करावरील शास्ती व विलंब शुल्कावर ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा २३१ क्रमांकाचा प्रस्ताव सोमवार, ६ डिसेंबर रोजी प्रशासक पाण्डेय यांनी मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत या योजनेचा लाभ मालमत्ताधारकांना घेता येईल.

शास्तीच ३४६ कोटींवर

गेल्यावर्षी २०२०-२१ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची मागणी ही ७० कोटी रुपये होती. तर उद्दिष्ट ४६८.६२ कोटी एवढे निश्चित केलेले होते. त्यात या वर्षी केवळ १०७.७६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. सध्या चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये थकबाकीची रक्कम ७४३.३२ कोटींवर गेली आहे. यावर रकमेत १९.२३ कोटी हे विलंब शुल्क तर तर शास्तीची रक्कम ३२७.६४ कोटी रुपये एवढी असून एकूण शास्ती व विलंब शुल्काचा रक्कम ३४६.८७ कोटी रुपये आहे. तसेच चालू वर्षाची मागणी १३५.२२ कोटी रुपये आहे. यात शहरातून जेवढे नागरिक शास्ती व विलंब शुल्काच्या ७५ टक्के सूट योजनेचा लाभ घेतील, तेवढा नागरिकांचा फायदा होणार आहे तर महापालिकेचा आर्थिक तोटा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT