Republican Party of India wants nine seats assembly election demand for Legislative Council ramdas athawale esakal
छत्रपती संभाजीनगर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला हव्यात नऊ जागा; तीन मंडळांसह विधानपरिषदेची मागणी - आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या. विधानसभेला तिन्ही पक्षांनी प्रत्येकी तीन, म्हणजे नऊ जागा दिल्याच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या. विधानसभेला तिन्ही पक्षांनी प्रत्येकी तीन, म्हणजे नऊ जागा दिल्याच पाहिजे, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

लोकसभेला रिपाइंमुळे महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या आहेत. रिपाइंमुळे महायुतीला मोठा फायदा होत असल्याने विधानसभेत छत्रपती संभाजीनगर मध्य, फुलंब्री, देगलूर (नांदेड), कळंब (धाराशिव) यासह किमान नऊ जागा मिळाल्या पाहिजेत. याशिवाय एक विधानपरिषद आणि तीन महामंडळे देण्याची मागणी आठवले यांनी केली.

‘मला समाजासाठी मंत्रिपद आवश्यक आहे. रिपाइंच्या कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा आहेत. म्हणूनच कार्यकर्त्यांनाही सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात मिळाला पाहिजे, ही अपेक्षा आहे’, असे ते म्हणाले. इंदूमिल येथील स्मारकाचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून, पुतळा उभारण्यास आणखी दोन वर्षे लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.

बुद्धविहाराला दिली भेट

शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहाराला नोटीस दिलेली असल्याने सकाळी विहाराला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. सदर वास्तूला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

मुळात ही जागा वनविभागाची असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या नोटीसमुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष आहे, म्हणूनच सोमवारी (ता. सात) बुद्धलेणी बचाव महामोर्चा काढण्यात येणार आहे, हा मोर्चा शांततेत काढावा असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगेंची मागणी योग्य; आम्ही सोबत

बीड : मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. जरांगेंच्या मागणीवर सरकारने वेळीच तोडगा काढावा. परंतु, ओबीसी समाजावरही अन्याय होऊ नये, याची काळजी घेत आरक्षण कसे द्यायचे, हे सरकारने ठरवावे, असे मत आठवलेंनी बीड येथे व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT